दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे शिवसेना नेत्या यांनी अभनेत्री दिपाली सय्यद यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी. मोदींबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल मुळे भाजRead about permalinks(opens in a new tab)प आक्रमक झाली आहे. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी दीपाली सय्यद हाय हाय म्हणत पोलीस स्टेशनमध्येच जोरदार घोषणाबाजी केली आहे. जर केतकी चितळेवर पोलीस कारवाई करू शकतात, तर दीपाली सय्यद यांच्यावर पोलीस कारवाई का करत नाही, असा सवाल करत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर एफआयआर नोंदवून कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
मागे काही दिवसांपुर्वी केतकी चितळेने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह ट्विट केलं होते त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे तिला अटक करून तिची सध्या चौकशी सुरू आहे. तसेच आता दीपाली सय्यदने केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीच्या भोवऱ्यात दीपाली सय्यद सापडली आहे. दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी भाजप महिला कार्यकर्त्यांकडे वेळ मागितला असून, व्हिडीओ तपासून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. दीपाली सय्यद हिला अटक होणार का ? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.