मुंबई: हिंदु संस्कृतीत दीप अमावस्या (Deep Amavasya 2025) ज्याला आषाढी अमावस्या असेही म्हटले जाते. हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हा दिवस आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच अमावस्येला साजरा केला जातो. यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. यंदा 24 जुलै रोजी दर्श अमावस्या आहे. आज आपण दीप अमावस्येचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व जाणून घेणार आहोत…
हिंदु परंपरेत दिवा हा प्रकाश, ज्ञान, शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानला जातो. देवघरात दिवा लावणे म्हणजे आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला समर्पित करणे होय.
दीप अमावस्येचे विशेष महत्त्व
आषाढ अमावस्या जी दीप अमावस्या (Deep Amavasya 2025) म्हणून साजरी केली जाते. विशेषत: महाराष्ट्र आणि कर्नाटकात उत्साहाने पाळली जाते. या दिवशी घरातील सर्व पणती, समई आणि निरांजन स्वच्छ करुन त्यांची पूजा केली जाते. ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करुन श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी केली जाते.
दीपपूजन
श्रावणाचे स्वागत
दीप अमावस्या ही श्रावण महिन्याच्या (Shravan Mahina) आगमनाची तयारी आहे. श्रावणात अनेक सण, उत्सव आणि व्रत असतात. ज्यामुळे वातावरण उत्साही आणि पवित्र बनते. दीप पूजनाने या महिन्याचे स्वागत केले जाते.
दीप अमावस्येला काय करावे?
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)