पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न असलेल्या काशी विश्वनाथ धामचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झाले. पंतप्रधानांच्या हस्ते संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी वाराणसी नगरी सजली आहे. या पार्श्वभूमीवर काशीनाथ विश्वनाथ मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
८ मार्च २०१९ साली पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ धामचे भूमीपूजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे आज पंतप्रधान मोदी या लोकार्पण कार्यक्रमानंतर अडीच हजार मजुरांसोबत भोजन करणार आहेत.
तब्बल ३३९ कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. काशी विश्वनाथ मंदिराला गंगा नदीशी जोडणारे सगळे मार्ग सहजतेने जोडण्याचे काम या प्रकल्पाअंतर्गत करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसाच्या वाराणसी दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कालभैरव मंदिराला भेट दिली तर सायंकाळी ६ वाजता रो-रो जहाजातून गंगा आरतीला उपस्थित राहणार आहेत. तसेच १४ डिसेंबर रोजी वारासणीतील स्वरवेद महामंदीर येथील सदगुरू सदाफलदेव विहंगम योग संस्थानच्या ९८व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.