पद्मश्री सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड

अनाथांची माय, थोर समाजसेविका आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या ७५व्या वर्षी पुण्यातील गॅलक्झी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महिन्याभर पूर्वी त्यांची एक शस्त्रक्रिया झाली होती. आणि मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवला आहे. तर अनेक कठिण प्रसंगांना तोंड देत त्यांनी अनाथ मुलांचा […]

पद्मश्री सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड

अनाथांची माय, थोर समाजसेविका आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या ७५व्या वर्षी पुण्यातील गॅलक्झी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महिन्याभर पूर्वी त्यांची एक शस्त्रक्रिया झाली होती. आणि मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवला आहे. तर अनेक कठिण प्रसंगांना तोंड देत त्यांनी अनाथ मुलांचा सांभाळ केला. नुकतेच २०२१साली सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सिंधुताई सपकाळ यांची जन्मभूमी वर्ध्यात असलेल्या माई निवास येथून त्यांचे कामकाज चालायचे. त्यांचे आत्पेष्ट इथेच राहतात. अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ अनाथ मुलांचा सांभाळ करायच्या तसेच त्या जनावरांवरही तितकेच प्रेम करायच्या. पुण्यातील मांजरी येथील संस्थेत त्यांनी गोशालाची निर्मिती केली. पुणे आणि वर्ध्यात त्यांनी ३५० गायी पोटच्या मुलासारख्या पाळल्या. मात्र आज अनाथांची माय आपल्याला सोडून गेल्यामुळे सर्वच स्तरावरून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाल्यामुळे त्यांची लहान मुले आज खऱ्या अर्थाने अनाथ झाली आहेत. सासवडजवळील कुंभारवळण या गावात माईंचे एक अनाथालय आहे. या अनाथालयामधील मुले आज माईंचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी त्या सर्व मुलांच्या डोळ्यात फक्त अश्रू वाहत होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number