Dashavatar Box Office Collection: ‘दशावतार’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तिसऱ्या आठवड्यातील कमाई पाहून थक्क व्हाल

दशावतार चित्रपट 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला असून हा सिनेमा तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करूनही थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय.

Dashavatar Box Office Collection: ‘दशावतार’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तिसऱ्या आठवड्यातील कमाई पाहून थक्क व्हाल

मुंबई: दशावतार चित्रपट 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला असून हा सिनेमा तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करूनही थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. तसेच प्रेक्षकांना आकर्षित करतोय. पहिल्या आठवड्यापासूनच या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. आता तो 20 कोटींच्या टप्प्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

पहिल्या आठवड्यात ‘दशावतार’ चित्रपटाने तब्बल 9.20 कोटींचा गल्ला जमा केला. दुसऱ्या आठवड्यात थोडी घसरण झाली तरीही 9.25 कोटींची कमाई झाली. तिसऱ्या आठवड्यात शुक्रवारी अवघी 45 लाख इतकी कमाई होती, जी चित्रपटाच्या आतापर्यंतच्या प्रवासातील सर्वात कमी रक्कम होती. मात्र शनिवारी म्हणजेच 27 सप्टेंबरला चित्रपटाने पुन्हा उभारी घेतली आणि जवळपास 90 लाखांची कमाई केली. त्यामुळे 27 सप्टेंबरपर्यंत एकूण गल्ला 19.80 कोटींवर पोहोचला आहे. 28 सप्टेंबरची आकडेवारी आल्यानंतर 20 कोटींचा टप्पा सहज पार होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा: Lata Mangeshkar Birth Anniversary : भारतरत्न लता मंगेशकर : अजरामर सुरांची सरगम, पंतप्रधान मोदींची भावनिक श्रद्धांजली

दशावतारसाठी दुसऱ्या आठवड्यातील रविवार विशेष ठरला. 21 सप्टेंबर रोजी चित्रपटाने तब्बल 3 कोटींची कमाई केली होता. सुबोध खानोलकर दिग्दर्शित या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे आणि आरती वडगबाळकर यांसारखे नामांकित कलाकार झळकले आहेत. तसेच कोकणातील स्थानिक कलाकारांचाही या सिनेमात सहभाग आहे.

'दशावतार' चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. त्यामुळे तिसऱ्या आठवड्यानंतरही या चित्रपटाची कमाई सुरू राहण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number