कोबीची कुरकुरीत भजी

कोबी आपल्याला आवडो अथवा मन आवडो पण आई नेहमीच घरी कोबीची भाजी बनवत असते. कारण कोबी मध्ये अनेक पोषक घटक असतात. कोबीच्या भाजीसह कोबीचे पराठे, कोबीची वडी. कोबीची भजी, असे अनेक पदार्थ केले जातात. तर आज पाहूया कोबीची भजी कशी बनवावी. कोबीची भजी पाककृती : साहित्य :-कोबी, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, हळद, लाल तिखट, धणे […]

कोबीची कुरकुरीत भजी

कोबी आपल्याला आवडो अथवा मन आवडो पण आई नेहमीच घरी कोबीची भाजी बनवत असते. कारण कोबी मध्ये अनेक पोषक घटक असतात. कोबीच्या भाजीसह कोबीचे पराठे, कोबीची वडी. कोबीची भजी, असे अनेक पदार्थ केले जातात. तर आज पाहूया कोबीची भजी कशी बनवावी.

कोबीची भजी

पाककृती :

साहित्य :-कोबी, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, हळद, लाल तिखट, धणे पूड, जिरे पूड, गरम मसाला, लिंबाचा रस , बेसन, तांदळाचं पीठ, तेल.

कृती :

सर्वप्रथमकोबी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कोबी बारीक चिरावा. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमुटभर हळद, एक चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा धणे पूड, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, लिंबाचा रस घालून सर्व एकत्र करून घ्यावे. दुसरीकडे एका भांड्यात एक कप बेसन, अर्धा कप तांदळाचे पीठ, २ चमचे तेल घालावे. त्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र करावे. यात गरज असल्यास पाणी घालावे अथवा कोबीला पाणी सुटते त्यामुळे पाणी जपून वापर.
आता मंद आचेवर कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा, त्यानंतर त्यात तयार केलेल्या मिश्रणाचे लहान लहान गोळे करून कोबीची भजी तळून घ्या. भजीला सोनेरी रंग आल्यानंतर काढून घ्या. अशा प्रकारे कोबीची कुरकुरीत भजी तयार होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number