कोविड कॉलर ट्यून लवकरच इतिहासजमा

गेल्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण देशभरात कोरोनाने थैमान घातले होते. कोरोनाने प्रत्येकाच्या घरापाशीच बस्तान ठोकले होते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेत सरकारने आखेलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत होते. नागरिकांना कोविड कॉलर ट्यूनच्या माध्यमातून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र, आता कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे कोविड कॉलर ट्यून लवकरच इतिहासजमा होणार असल्याची माहिती […]

कोविड कॉलर ट्यून लवकरच इतिहासजमा

गेल्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण देशभरात कोरोनाने थैमान घातले होते. कोरोनाने प्रत्येकाच्या घरापाशीच बस्तान ठोकले होते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेत सरकारने आखेलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत होते. नागरिकांना कोविड कॉलर ट्यूनच्या माध्यमातून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र, आता कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे कोविड कॉलर ट्यून लवकरच इतिहासजमा होणार असल्याची माहिती केंद्राच्या दूरसंचार विभागाने दिली आहे.

कोरोना काळात नागरिकांना कोविड कॉलर ट्यूनच्या माध्यमातून संदेश देण्यात येत होता. तर एखाद्याला फोन लावला की, कोविड कॉलरट्यूनमुळे अधिकचा वेळ जात असे. त्यामुळे देशभरात कोरोना ओसरल्यामुळे कॉलर ट्यूनच्या विरोधात राग व्यक्त होत आहे. त्याबाबत, होणाऱ्या तक्रारीची दाखल घेत हा केंद्राच्या दूरसंचार विभागाने कॉलर ट्यून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कॉलर ट्यूनविरोधात काय आहेत आक्षेप?

  • कॉलर ट्यूनमुळे खूप वेळ वाया जातो.
  • कॉलर ट्यूनमुळे फोन लावत असताना वाट पहावी लागते.
  • अडचणीच्यावेळी तातडीने फोन जोडला जात नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number