पालघर जिल्हा परिषदेत सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. एकाच शाळेच्या दुरुस्तीची कामं तब्बल अठरा वेळा केली जातात. तर जिल्ह्यात सुरू असलेल्या शेकडो जलजीवन मिशनच्या कामांमध्येही भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला आहे. पालघर जिल्हा परिषद सेना-भाजपची जिल्हा निर्मितीपासून सत्ता असून सध्या या जिल्हा परिषदेत मोठा भ्रष्टाचार असल्याच सांगत शिक्षकांच्या बदल्यांमध्येही पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं गावित यांनी सांगितलं. गावीत यांच्या या आरोपामुळे उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून या भ्रष्टाचाराची तक्रार आपण वरिष्ठांकडे करणार असल्याचं गावित यावेळी म्हणाले.