जव्हार-मोखाड्यात ड्रोनद्वारे पोहोचवल्या कोरोना लशी

पालघरमधील जव्हार मोखाडासारख्या अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात वाहतूक पूरक सुविधा नसल्याने या भागात कोरोना लसीचे डोस पोहचविण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. मात्र यावर तोडगा काढत राज्याच्या आरोग्य विभागामार्फत ब्ल्यू इन्फिनिटी आणि आय.एफ. एल फाउंडेशन यांच्या माध्यमातून ड्रोनद्वारे लस पोहोचवण्याचा अनोखा प्रयोग आज पार पडला. आता कोरोना लस ड्रोनच्या मदतीने अतिदुर्गम गावापर्यंत पोहचवली जाणार आहे. जव्हारमधील […]

जव्हार-मोखाड्यात ड्रोनद्वारे पोहोचवल्या कोरोना लशी

पालघरमधील जव्हार मोखाडासारख्या अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात वाहतूक पूरक सुविधा नसल्याने या भागात कोरोना लसीचे डोस पोहचविण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. मात्र यावर तोडगा काढत राज्याच्या आरोग्य विभागामार्फत ब्ल्यू इन्फिनिटी आणि आय.एफ. एल फाउंडेशन यांच्या माध्यमातून ड्रोनद्वारे लस पोहोचवण्याचा अनोखा प्रयोग आज पार पडला.

आता कोरोना लस ड्रोनच्या मदतीने अतिदुर्गम गावापर्यंत पोहचवली जाणार आहे. जव्हारमधील झाप येथे आज लसीचे ३०० डोस ड्रोनच्या मदतीने पाठवण्यात आले. या ड्रोनची पंचवीस किलोमीटर पर्यन्त पाच किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे ठरले आहे. तसेच आता ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणे बंधनकारक असल्याचा निर्णय प्रशासनाने काढला आहे. याच पार्श्वभूमीवर पालघरमधील जव्हार मोखाडासारख्या अतिदुर्गम भागात ड्रोनच्या मदतीन कोरोना लस पोहचवण्यात आल्या आहते.

ड्रोनच्या मदतीने कोरोना लस पोहचवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे अतिदुर्गम भागांमध्ये आता, लस पोहचणार आहेत. तसेच या डोंगराळ भागांतील नागरिकही आता लसवंत होणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number