देशात पुन्हा कोरोना वाढ

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. मात्र, पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दरम्यान, दिल्लीसह हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्ये मास्क घालणे बंधनकारक झाले आहे. देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं […]

देशात पुन्हा कोरोना वाढ

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. मात्र, पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दरम्यान, दिल्लीसह हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्ये मास्क घालणे बंधनकारक झाले आहे.

देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. देशात दिल्लीसह हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्येही मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. तसेच पंजाब सरकारने देखील लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. सध्या देशात कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. मास्क मुक्ती, शाळा सुरु करणे, कार्यक्रमांवरील बंधने हटवल्याने कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढते रुग्ण पाहता, दिल्ली सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. तसेच मास्क न घालणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number