शुक्रवारी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प २०२२ सादर केला. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने नैसर्गिक वायूवरील करात १० टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे गृहिणी तसेच सीएनजी वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गृहिणी तसेच सीएनजी वाहनचालकांना अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळाला आहे. सीएनजी आणि पीएनजी निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या नैसर्गिक वायू मूल्यवर्धित कर १३.५० टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर करण्याची घोषणा राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केली. त्यामुळे आता राज्यातील सीएनजी आणि पीएनजीचे दर आठ रुपयांनी कमी होणार आहेत. मात्र, अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२-२३ वर्षाचा राज्याचा अर्थसंक्लप शुक्रवारी मांडला. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने सीएनजीवरील कर कमी केले आहेत. तसेच नैसर्गिक वायूवरचा कर कमी केल्यामुळे सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार आहेत.