काँग्रेसचे आशिष देशमुख देणार राजीनामा

राज्यसभेच्या उमेदवारीवरून आता राजकारणात वातावरण चांगलेच तापलेलं आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरून सध्या सगळ्यात पक्षांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. त्यातच आता काँग्रेसचे सरचिटणीस आशिष देशमुख यांनी उत्तर प्रदेशमधील प्रतापगडी पक्षाकडून यांना महाराष्ट्रातून राज्यसेभची  उमेदवारी दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसचे सरचिटणीस आशिष देशमुख यांनी काँग्रेस सरचिटणीस पदाचा राजीनामा देणार असल्याचा जाहीर केले आहे. पक्षाकडून जी उमेदवारी […]

काँग्रेसचे आशिष देशमुख देणार राजीनामा

राज्यसभेच्या उमेदवारीवरून आता राजकारणात वातावरण चांगलेच तापलेलं आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरून सध्या सगळ्यात पक्षांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. त्यातच आता काँग्रेसचे सरचिटणीस आशिष देशमुख यांनी उत्तर प्रदेशमधील प्रतापगडी पक्षाकडून यांना महाराष्ट्रातून राज्यसेभची  उमेदवारी दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसचे सरचिटणीस आशिष देशमुख यांनी काँग्रेस सरचिटणीस पदाचा राजीनामा देणार असल्याचा जाहीर केले आहे.

पक्षाकडून जी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्याबद्दल आशिष देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. उत्तर प्रदेशातून केवळ दोन आमदार निवडून आले आहेत. अशा राज्यातून प्रतापगडी. राजीव शुक्ला आणि प्रमोद तिवार यांना राज्यसभेवर पाठवणे किती योग्य आहे असा सवाल आशिष देशमुख यांनी केला आहे.

काँगेसच्या पक्ष श्रेष्ठींच्या अशा प्रकारच्या अशा चुकीच्या निर्णायाविरोधात मी सरचिटणीस पदाचा राजीनामा देणार आहे. आशिष देशमुख म्हणाले, मी माझ्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. कारण, महाराष्ट्रात अतिशय कर्तबगार आणि काँग्रेसला रिझल्ट देऊ शकतात असे नेते उपलब्ध आहेत. असं असताना एका बाहेरील उत्तर प्रदेशच्या व्यक्तीला इम्रान खान उर्फ इम्रान प्रतापगडी या नवख्या व्यक्तीला महाराष्ट्रात लादण्यात आलंय. त्यांना काँग्रेसच्या वतीने राज्यसभेची उमदेवारी देण्यात आलीय. या निर्णयाच्या निषेधार्थ मी माझ्या महासचिव पदाचा राजीनामा देत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number