ब्रिजेश दिक्षित यांच्या विरोधात तक्रार

महामेट्रोचे एमडी ब्रिजेश दीक्षित यांना मुदतवाढ देण्यास केंद्राने रेड सिग्नल दिल्यानंतर अखेर दीक्षित यांनी कारभार डॉ नितीन करीर यांना सोपवला आहे. दीक्षित यांच्यावर कॅग ने ताशेरे ओढले होते त्यासंबंधीचा अहवाल राज्य सरकारला दिला होता. महामेट्रो चे एमडी ब्रिजेश दीक्षित यांनी कामात अनियमितता केली असून दीक्षित यांची सीबीआय चौकशी व्हावी ही मागणी काँग्रेस आमदार विकास ठाकरे […]

ब्रिजेश दिक्षित यांच्या विरोधात तक्रार

महामेट्रोचे एमडी ब्रिजेश दीक्षित यांना मुदतवाढ देण्यास केंद्राने रेड सिग्नल दिल्यानंतर अखेर दीक्षित यांनी कारभार डॉ नितीन करीर यांना सोपवला आहे.

दीक्षित यांच्यावर कॅग ने ताशेरे ओढले होते त्यासंबंधीचा अहवाल राज्य सरकारला दिला होता. महामेट्रो चे एमडी ब्रिजेश दीक्षित यांनी कामात अनियमितता केली असून दीक्षित यांची सीबीआय चौकशी व्हावी ही मागणी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केली असून यासाठी ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना पत्र सुद्धा पाठविल आहे. दीक्षित यांच्या ८ वर्षाच्या कार्यकाळात नागपूर सहित पुणे मेट्रो च्य कामाला गती मिळाली होती.

गेल्या आठ वर्षांपासून दीक्षित यांच्याकडे मेट्रोचे नेतृत्व होते. २०१४ मध्ये नागपूर मेट्रो सुरू करण्यासाठी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प स्थापन करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकल्पाचे नाव बदलून महामेट्रो असं करण्यात आलं. ब्रिजेश दीक्षित यांच्या कार्यकाळात नागपुरात ३८ किलोमीटरच्या मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला. ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या संपूर्ण टप्प्याचे उद्घाटन आणि दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. दीक्षित यांच्या नेतृत्वात महा मेट्रो ने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कामही सुरू केले आहे.

काही दिवसांपूर्वी पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी डॉक्टर दीक्षित यांच्या मुदत वाढीवर आक्षेप घेतला होता. त्यांनी या संदर्भात पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून दिक्षित यांना मुदतवाढ देऊ नये अशी मागणी केली होती. ठाकरे यांनी डॉक्टर दीक्षित यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

काँग्रेस आमदार विकास ठाकरेंकडून तक्रार
नागपूर मेट्रोच्या कारभारात गैरप्रकार आणि पैशाचा दुरुपयोग झाल्याचा आरोप ठाकरे यांनी केला होता. ब्रिजेश दीक्षित हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गुड बुक मधले समजले जातात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number