Military Flight Crashed: लष्करी विमान जंगलात कोसळले; 66 सैनिकांचा करुण अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

या विमानात 125 सैनिक आणि लष्करी दलाचे कर्मचारी प्रवास करत होते. किमान 66 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत.

Military Flight Crashed: लष्करी विमान जंगलात कोसळले; 66 सैनिकांचा करुण अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया येथे एक मोठी लष्करी विमान दुर्घटना घडल्याने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सोमवारी 23 मार्च 2026 रोजी सकाळी उड्डाण घेत असताना कोलंबियाच्या लष्कराचे C-130 हरक्यूलिस हे विमान कोसळले. या विमानात एकूण 125 सैनिक आणि लष्करी दलाचे कर्मचारी प्रवास करत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भीषण दुर्घटनेत किमान 66 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

हे विमान पुएर्तो लेगुइज़ामो येथून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच दुर्घटनाग्रस्त झाले. ही जागा इक्वाडोर आणि पेरूच्या दक्षिण सीमेजवळील दाट जंगलाच्या भागात आहे. विमान कोसळल्यानंतर त्याचे जळते अवशेष जंगलात विखुरले गेले. लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार मृतांमध्ये 58 सैनिक, वायुसेनेचे सहा कर्मचारी आणि दोन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

दुर्घटनेनंतर सुरुवातीला स्थानिक प्रशासनाने मृतांचा आकडा 33 असल्याचे सांगितले होते. मात्र बचावकार्य पुढे सुरू असताना मृतांची संख्या वाढत गेली. जखमींना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवून उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेमागील नेमके कारण काय होते याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा: Ashok Kharat Case Helpline Number : घाबरू नका आणि समोर या! भोंदूबाबा अशोक खरातच्या गुन्ह्यांमध्ये वाढ, आता तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी

ज्या सीमावर्ती भागात विमान कोसळले, त्या परिसरात मागील काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणावर लष्करी हालचाली सुरू होत्या. कोलंबिया आणि इक्वाडोरच्या सुरक्षा दलांकडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरोधात आणि सशस्त्र गटांविरोधात कारवाई केली जात होती. दुर्घटनेनंतर घटनास्थळावरून मिळालेल्या छायाचित्रांमध्ये विमानाचा तुटलेला मागील भाग आणि झाडांवरून उसळणाऱ्या आगीच्या ज्वाळा दिसत होत्या.

कोलंबियाचे संरक्षणमंत्री पेद्रो सांचेज यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. “ही देशासाठी अत्यंत दु:खद घटना आहे. अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी सध्या चौकशी सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले. लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार विमानात 114 सैनिक आणि 11 लष्करी दलाचे सदस्य होते. ते पुएर्तो लेगुइज़ामो येथून अमेझॉन परिसरातील एका लष्करी तळाकडे जात होते. स्थानिक रहिवाशांनी आकाशात मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकला असल्याचे सांगितले.

कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी या दुर्घटनेचा एक व्हिडिओ शेअर करत ही “भीषण दुर्घटना” असल्याचे म्हटले आहे. त्यांनी लष्कराच्या उपकरणांचे आधुनिकीकरण करण्याची गरज अधोरेखित केली, मात्र या अपघाताचे कारण थेट विमानाच्या स्थितीशी जोडले नाही.

दरम्यान, मागील एका महिन्याच्या आत दक्षिण अमेरिकेत C-130 हरक्यूलिस विमानाची ही दुसरी दुर्घटना ठरली आहे. चार इंजिन असलेले हे टर्बोप्रॉप विमान लॉकहीड मार्टिन कंपनीने तयार केले असून जगभरातील अनेक देशांच्या सैन्याकडून त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याआधी 27 फेब्रुवारी 2026 रोजी बोलिव्हियामध्ये लष्करी मालवाहू विमान उतरतानाच दुर्घटनाग्रस्त झाले होते, ज्यात किमान 24 जणांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा: Eknath Shinde: महायुतीत ठिणगी? मध्यरात्री ‘वर्षा’वर एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्यात काय झाली चर्चा?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number