राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील महाविद्यालये बंद करण्याबाबत राज्य सरकारची चर्चा सुरू होती. दरम्यान आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालय बंद करण्याबाबत निर्णय घेतला आहे. राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. […]

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील महाविद्यालये बंद करण्याबाबत राज्य सरकारची चर्चा सुरू होती. दरम्यान आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालय बंद करण्याबाबत निर्णय घेतला आहे. राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.

महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद असली तरी विद्यार्थ्यांचे वर्ग मात्र ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतही महत्त्वाचा निर्णय उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. विद्यापीठांच्या सर्व परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे.

विद्यापीठ आणि महाविद्यालयांशी संबंधित वसतीगृहदेखील १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन वसतिगृह बंद करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच कृषी महाविद्यालय वगळता राज्यातील सर्व महाविद्यालये बंद असणार आहेत. तर विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवली जाणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number