Cockroach Janata Party: दिल्लीत आज जेन-झींचा एल्गार; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सरकारची काय भूमिका?

नीटसह विविध परीक्षांतील कथित गैरव्यवहारांविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे.

Cockroach Janata Party: दिल्लीत आज जेन-झींचा एल्गार; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सरकारची काय भूमिका?

Cockroach Janata Party: देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाकडे आज सर्वांचे लक्ष लागले आहे. नीट (NEET) आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावर हा पक्ष दिल्लीत मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके अमेरिकेतून भारतात परतत असून त्यांच्या आगमनानंतर राजधानीत आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सीजेपीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी जंतरमंतर परिसरात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनाचा मुख्य मुद्दा म्हणजे परीक्षा प्रक्रियेमधील कथित त्रुटी, पेपरफुटीच्या घटना आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न. पक्षाने केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.

हेही वाचा: Ebola Case In India: इबोलाचा भारतात शिरकाव? युगांडाहून जयपूरमध्ये आलेल्या परदेशी महिलेमध्ये लक्षणे; आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर

मात्र आंदोलनाबाबत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलनासाठी आवश्यक असलेला अधिकृत अर्ज अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आंदोलनाला परवानगी मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता कायम आहे. पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले असून सुरक्षा व्यवस्थाही मजबूत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या आंदोलनाशी संबंधित एका याचिकेवर उच्च न्यायालयातही चर्चा झाली. मोठ्या संख्येने लोक एकत्र येण्याच्या घोषणांमुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिल्याचे समजते.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीजेपीने सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी काही विशेष सूचना जारी केल्या आहेत. आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने पार पडावे, यासाठी पक्षाने राष्ट्रध्वज आणि एक पुस्तक सोबत आणण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह आंदोलनात सहभागी व्हावे, असेही पक्षाने म्हटले आहे.

हेही वाचा: Oil-Gas Discovery: इंधनाच्या संकटात भारताच्या शेजारील देशाला लागला जॅकपॉट; सापडला तेल आणि वायूचा अथांग साठा

याशिवाय आंदोलनादरम्यान कोणतेही उपद्रवी कृत्य दिसल्यास त्याची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी होणाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे आणि शांतता राखावी, असेही मार्गदर्शन करण्यात आले आहे.

दुसरीकडे, काही गोष्टी टाळण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या चिथावणीखोर व्यक्तींशी वाद घालू नये, ट्रोलिंग करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे आणि शिस्त पाळावी, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.

अभिजित दिपके यांच्या भारतात आगमनानंतर आंदोलनाची दिशा आणि सरकारची प्रतिक्रिया काय असेल, याकडे विद्यार्थी, पालक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दिल्लीतील हे आंदोलन केवळ एका पक्षापुरते मर्यादित राहणार की ते व्यापक विद्यार्थी चळवळीत रूपांतरित होणार, याची उत्सुकता वाढली आहे. आगामी काही तासांत परिस्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number