‘शिंदेंनी देव पाण्यात ठेवावे’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासह शिवसेनेचे आमदार आणि भाजपा नेतेही अयोध्यात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून विरोधकांनी राज्यसरकारव टीकेची झोड केली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदेच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका करताना न्यायालयीन निकालाची आठवण करून दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी अयोध्याच […]

‘शिंदेंनी देव पाण्यात ठेवावे’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासह शिवसेनेचे आमदार आणि भाजपा नेतेही अयोध्यात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून विरोधकांनी राज्यसरकारव टीकेची झोड केली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदेच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका करताना न्यायालयीन निकालाची आठवण करून दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी अयोध्याच नव्हे तर काशी, गुवाहाटीचे दौरेही करावेत. अजून न्यायालयाचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देव पाण्यात ठेवावेत. निकाल आता न्यायमूर्तींच्या हातात आहे, असा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

तसेच, ईव्हीएमचा मुद्दा अनेक वर्षांपासून मतभेदाचा राहिला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ईव्हीएममध्ये सरकारकडून काही अपप्रकार होतोय का, याबद्दल आजपर्यंत काही पुरावा मिळालेला नाही. कोणत्याही निवडणूक यंत्रणेवर लोकांचा विश्वास पाहिजे. मात्र, लोकांचा ईव्हीएम व्यवस्थ्वरून विश्वास उडाला आहे, असेही चव्हाण म्हणाले. तर, ईव्हीएम ऐवजी पेपरबेस मतदान घेण्याची मागणी विरोधक यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number