CJP Protest : दगडांनी भरलेला ट्रक, काचा फुटलेली कार…, अभिजीत दीपकेंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप; व्हिडीओ शेअर

जंतरमंतरवरील कॉक्रोज जनता पार्टीच्या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती. कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

CJP Protest : दगडांनी भरलेला ट्रक, काचा फुटलेली कार…, अभिजीत दीपकेंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप; व्हिडीओ शेअर

नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सोनम वांगचूक यांनी आमरण उपोषणाचा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या उपोषणाचा 20 वा दिवस उजाडला असताना दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना आंदोलन स्थळावरून ताब्यात घेतले. अभिजीत दिपके आणि सोनम वांगचूक हे दिल्ली येथील जंतर मंतर येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करीत होते. मात्र सोनम वांगचूक यांना ताब्यात घेतल्यानंतर सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारच्या निषेधार्थ सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने नीट पेपरफुटी आणि परीक्षा घोटाळ्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर मोर्चा काढला आहे.

हेही वाचा- Delhi Jantar Mantar Protest: संसदेच्या अधिवेशनादरम्यान दिल्लीत गदारोळ; आंदोलकांवर लाठीचार्ज, इंटरनेट आणि मोबाईल यंत्रणा ठप्प

मात्र दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, या मोर्चाला परवानगी दिली जाणार नाही. त्यांनी जंतरमंतरवरील सध्याच्या आंदोलनाला “बेकायदेशीर” म्हटले असून, निदर्शकांनी संसदेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा इशारा दिला. यानंतर जंतर मंतर परिसरात दगडांनी भरलेला डम्पर आणि काचा फुटलेली कार आढळली असून  कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यासंदर्भातला एक व्हिडिओ अभिजित दिपके यांनी ट्विट केला आहे. 

तसेच ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “दिल्ली पोलिसांवर धिक्कार असो! जंतर मंतरवर दगडांनी भरलेला एक ट्रक आणि एक तोडफोड केलेली व्हॅन आधीच ठेवण्यात आली आहे. लवकरच, गोदी मीडिया अशा बातम्या चालवेल की, या शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आंदोलकांनीच व्हॅनची तोडफोड केली. जंतर मंतरवर दगडांनी भरलेला ट्रक उभा करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा नक्की काय करत आहे? शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या CJP आंदोलकांवर दगडफेक घडवून आणण्याचे तेच सूत्रधार आहेत का?” या दरम्यान जमावाने संसदेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करताच पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार चकमक उडाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शीघ्र कृती दलाने आंदोलकांवर थेट काठ्या चालवल्या, तर काही निदर्शकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number