CJP Protest: नेटवर्क नाही, तरी संपर्क सुरू! CJP आंदोलनात ब्लूटूथ मेसेजिंग ॲपचा वापर; कसं काम करतं हे तंत्रज्ञान?

दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान इंटरनेट सेवा बंद झाल्यानंतर आंदोलकांनी ब्लूटूथ-आधारित ऑफलाइन मेसेजिंग ॲपचा वापर सुरू केल्याची चर्चा आहे.

CJP Protest: नेटवर्क नाही, तरी संपर्क सुरू! CJP आंदोलनात ब्लूटूथ मेसेजिंग ॲपचा वापर; कसं काम करतं हे तंत्रज्ञान?

नवी दिल्ली: दिल्लीतील जंतर-मंतर आणि कॅनॉट प्लेस परिसरात सुरू असलेल्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी संवादासाठी वेगळा पर्याय स्वीकारल्याची चर्चा रंगली आहे. इंटरनेट उपलब्ध नसतानाही काही आंदोलक परस्पर संपर्कासाठी ऑफलाइन मेसेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलनाच्या परिसरात मोबाईल इंटरनेट सेवा बंद असल्याने अनेक जण इंटरनेटशिवाय चालणाऱ्या मेसेजिंग ॲप्सचा वापर करत आहेत. या ॲप्सच्या मदतीने मोबाईल नेटवर्क किंवा वाय-फाय नसतानाही जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधता येतो. याबाबत पोलिसांनाही माहिती मिळाल्याचे वृत्त आहे. मात्र, आंदोलक नेमके कोणते ॲप वापरत आहेत, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

हेही वाचा: Aditya Thackeray : क्रूर दडपशाही आणि विद्यार्थ्यांच्या अटकेच्या विरोधात निषेध मोर्चा; 'वन नेशन, वन इमोशन'च्या अंतर्गत आदित्य ठाकरेंनी केले आंदोलनाचे आयोजन

या प्रकारातील ॲप्स ब्लूटूथ लो एनर्जी (Bluetooth Low Energy) आणि Bluetooth Mesh तंत्रज्ञानावर आधारित असतात. या प्रणालीमध्ये प्रत्येक स्मार्टफोन दुसऱ्या फोनशी थेट जोडला जातो. एका फोनवरून दुसऱ्या फोनकडे आणि पुढे इतर फोनकडे संदेश पोहोचत राहतो. अशा पद्धतीने मर्यादित अंतरात इंटरनेटशिवायही संदेशांची देवाणघेवाण शक्य होते.

सामान्यपणे व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा सिग्नल यांसारख्या ॲप्ससाठी इंटरनेट आवश्यक असते. मात्र ऑफलाइन मेसेजिंग ॲप्समध्ये इंटरनेटऐवजी ब्लूटूथचा वापर केला जातो. दोन उपकरणे साधारण 100 मीटरच्या परिसरात असतील तर संदेश पाठवता येतो. त्यानंतर जवळील इतर उपकरणांच्या मदतीने हा संदेश पुढे पाठवला जातो. यालाच Mesh Network असे म्हटले जाते.

हेही वाचा: Preity Zinta Tweet: 'विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे, पण देशविरोधी…'; प्रीती झिंटाने व्यक्त केली मोठी चिंता, पोस्ट व्हायरल

या तंत्रज्ञानाची चर्चा यापूर्वीही झाली होती. 2025 मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी Bitchat नावाचे ऑफलाइन मेसेजिंग ॲप सादर केले होते. इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्कशिवाय संवाद साधण्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले होते. अशाच प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर आंदोलनादरम्यान होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, इंटरनेट सेवा बंद असतानाही संवाद सुरू ठेवण्यासाठी अशा तंत्रज्ञानाचा वापर भविष्यात आणखी वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने अशा माध्यमांचा वापर, त्यांचे नियमन आणि संभाव्य परिणाम यावरही चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाइन मेसेजिंग तंत्रज्ञान पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number