ChatGPT Shopping Research: ऑनलाईन शॉपिंग करताना योग्य प्रॉडक्ट निवडणे, त्या वस्तूची खरी किंमत शोधणे आणि कोणत्या वेबसाइटवर सर्वोत्तम ऑफर मिळेल हे समजून घेणे अनेकांसाठी अवघड काम ठरते. याच समस्येवर उपाय म्हणून OpenAI ने ChatGPT मध्ये एक अत्याधुनिक फीचर लॉन्च केले आहे, जे तुमची शॉपिंग अधिक स्मार्ट, सोपी आणि किफायतशीर बनवणार आहे. हे नवे फीचर ChatGPT Shopping Research या नावाने उपलब्ध असून जगभरातील वापरकर्त्यांसाठी रोलआउट करण्यात आले आहे.
शॉपिंग रिसर्च म्हणजे नेमकं काय?
हे फीचर एक प्रकारचे ‘इंटरेक्टिव प्रोडक्ट रिसर्च टूल’ आहे. ठराविक वस्तू खरेदी करण्यापूर्वी तुम्ही सामान्यपणे गुगल सर्च, रिव्ह्यू वाचणे, किंमती तपासणे किंवा वेगवेगळ्या वेबसाइटवर तुलना करण्याचे काम करता. आता ही सर्व मेहनत ChatGPT तुमच्यासाठी करणार आहे.
GPT-5 mini मॉडेलवर आधारित हे टूल प्रोडक्ट पेज वाचू शकते, त्यातील मुख्य वैशिष्ट्ये ओळखू शकते, रिव्ह्यूचे विश्लेषण करू शकते आणि विश्वसनीय स्रोतांकडून माहिती गोळा करून तुम्हाला सर्वात चांगला पर्याय सुचवते.
विशेष म्हणजे, हे फक्त तुमच्या प्रश्नाला उत्तर देत नाही तर तुमच्या गरजा जसे बजेट, ब्रँडची पसंती, प्रोडक्टचा आकार, फीचर्स, वापराचा उद्देश — या सर्व बाबी समजून घेत संपूर्ण रिसर्च तयार करते.
हा फीचर खालील श्रेणीतील वस्तू खरेदी करताना सर्वाधिक उपयोगी ठरतो:
इलेक्ट्रॉनिक्स (मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही)
किचन आणि होम अप्लायन्सेस
ब्युटी आणि स्किनकेअर प्रोडक्ट्स
फिटनेस उपकरणे
आउटडोअर गिअर
घरगुती केअर आयटम्स
कपडे आणि अॅक्सेसरीजसाठी तर हे टूल प्रतिमा विश्लेषित करून तुमच्या पसंतीनुसार गिफ्ट आयडियादेखील देते.
हे फीचर कसे वापरायचे?
ChatGPT मध्ये शॉपिंग रिसर्च वापरण्याचे दोन सोपे मार्ग आहेत:
थेट प्रॉम्प्ट टाका:
तुम्ही टेक्स्ट बॉक्समध्ये शॉपिंगसंबंधी कुठलाही प्रश्न टाकल्यावर स्क्रीनवर "शॉपिंग रिसर्च" नावाचे कार्ड दिसेल. त्यावर टॅप करा आणि टूल सुरू होईल.
टूल्स मेनूमधून:
ChatGPT अॅप किंवा वेब उघडा → (+) मेनू → "Shopping Research" निवडा.
एक व्हिज्युअल इंटरफेस उघडेल जिथे तुम्ही तुमच्या पसंतीचे पर्याय निवडू शकता आणि टूल तुमच्यासाठी कस्टमाइज्ड शॉपिंग गाईड तयार करेल.
पैसा आणि वेळ दोन्हीची बचत
OpenAI चा दावा आहे की हा फीचर वापरकर्त्यांचा वेळ, पैसे आणि अनावश्यक तुलना करण्याची मेहनत मोठ्या प्रमाणात कमी करतो. एका ठिकाणी सर्व माहिती मिळाल्यामुळे कुठे उत्तम ऑफर आहे, कोणता प्रोडक्ट जास्त विश्वासार्ह आहे आणि कोणत्या वेबसाइटवर सर्वाधिक फायदेशीर डील मिळेल याचा स्पष्ट अंदाज मिळतो.
ऑनलाईन शॉपिंग हा आजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. अशात ChatGPT चे हे नवे फीचर लोकांच्या दैनंदिन वापरातील मोठ्या समस्येवर उपाय देणार आहे. तांत्रिक माहिती समजावून घेण्यात अडचण असो किंवा सर्वोत्तम किंमतीचा शोध आता ChatGPT तुमचा ‘शॉपिंग पार्टनर’ बनणार आहे.