राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपच्या चित्रा वाघ यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःवरील टीका नाकारताना चित्रा वाघ यांचे चारित्र्यहनन केले. संतापलेल्या चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाडांवर घणाघात केला आहे.
मोबाईल गेमच्या आडून धर्मांतराचा मुद्दा महाराष्ट्रात तापलेला आहे. याप्रकरणी गुरुवारी (८ जून) पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडून ‘भ’ अक्षराची शिवी बाहेर पडली. त्यानिमित्ताने चित्रा वाघ यांनी आव्हाडांना धारेवर धरलं आहे. शिवी दिली नसल्याचं सांगताना ट्विटमध्ये आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्या चारित्र्याबाबत अत्यंत खालच्या पातळीवर सांकेतिक उल्लेख केले. त्यामुळे, संतापलेल्या चित्रा वाघ यांनी आव्हाड यांचा समाचार घेतला आहे.
काय म्हणाल्या चित्र वाघ ?
“सत्ता काय गेली, सत्तेबरोबर मतीही गेली. आजकाल मविआच्या नेत्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झालेला दिसतोय की त्यांचा जीभेवरही ताबा राहिलेला नाही.” “पत्रकार परिषदेत जाहीररित्या शिवीगाळ करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही त्यांच्या स्वभावाप्रमाणं सडत चाललाय, अशा विकृतींना वेळीच आवर घाला आणि यांना येरवड्याच्या रूग्णालयात दाखल करा.”, असे ट्विट चित्र वाघ यांनी केले आहे.
सत्ता काय गेली, सत्तेबरोबर मतीही गेली…
आजकाल मविआच्या नेत्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झालेला दिसतोय की त्यांचा जीभेवरही ताबा राहिलेला नाही पत्रकार परिषदेत जाहीररित्या शिवीगाळ करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही त्यांच्या स्वभावाप्रमाणं सडत चाललाय @Awhadspeaks अशा विकृतींना… — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 8, 2023