चंद्रशेखर बावनकुळेंचा पवारांना टोमणा

   ‘संभाजी राजेंना हिणवून अजित पवारांनी पराक्रम केला का ?’ असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना केला आहे.    छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर, विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात वाहनांवर  ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या आशयाचे स्टिकर्स चिकटवले.    हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर नाही, तर […]

चंद्रशेखर बावनकुळेंचा पवारांना टोमणा

   ‘संभाजी राजेंना हिणवून अजित पवारांनी पराक्रम केला का ?’ असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना केला आहे.
   छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर, विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात वाहनांवर  ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या आशयाचे स्टिकर्स चिकटवले.
   हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर नाही, तर स्वराज्यरक्षक होते’ असे वक्तव्य केल्यानंतर, शुक्रवारी, दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी पुण्यात याच आशयाचे स्टिकर्स वाटले आहेत. हे स्टिकर्स पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांच्या वाहनांवर लावण्यात आले, तसेच सामान्य नागरिकांनाही वाटण्यात आले. अजित पवारांच्या याच कृतीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ”संभाजी राजेंना हिणवून अजित पवारांनी पराक्रम केला का ?’ असा सवाल विचारत टोमणा मारला आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number