चंद्रपूर जाहले श्रीराममय

चंद्रपूर जिल्ह्यातील दर्जेदार सागवान राम मंदिराच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. २९ मार्चला भव्य शोभायात्रेसह लाकडाची पहिली खेप अयोध्येला जाणार आहे. रामजन्मभूमी अयोध्या येथे भव्य राम मंदिर उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. रामलला मंदिरात विराजमान होण्याची रामभक्त मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभू श्रीराम यांची मूर्ती बनवण्यासाठी नेपाळच्या नदीतून शालीमार दगड नेण्यात आले. त्यानंतर आता राम […]

चंद्रपूर जाहले श्रीराममय

चंद्रपूर जिल्ह्यातील दर्जेदार सागवान राम मंदिराच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. २९ मार्चला भव्य शोभायात्रेसह लाकडाची पहिली खेप अयोध्येला जाणार आहे. रामजन्मभूमी अयोध्या येथे भव्य राम मंदिर उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. रामलला मंदिरात विराजमान होण्याची रामभक्त मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभू श्रीराम यांची मूर्ती बनवण्यासाठी नेपाळच्या नदीतून शालीमार दगड नेण्यात आले. त्यानंतर आता राम मंदिराच्या उभारणीत महाराष्ट्राचेदेखील योगदान असणार आहे.

कोट्यवधी रामभक्तांची श्रध्दा असलेल्या अयोध्येत श्रीराम मंदिराचे काम सुरू असून भव्यदिव्य स्वरुपातील राम मंदिर उभारणीत चंद्रपुरचेही योगदान असणार आहे. मंदिर उभारणीसाठी आवश्यक असलेले मौल्यवान काष्ठ चंद्रपूर येथून रवाना होणार आहे.राम मंदिराच्या निर्मितीसाठी राजस्थानातील खास दगडांचा वापर करण्यात आला असून, मंदिराच्या उभारणीत महाराष्ट्राचे देखील योगदान देखील असणार आहे. मंदिरासाठी लागणारे १८०० क्यूबिक मीटर लाकूड महाराष्ट्रातून जाणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सापडणारे सागवान काष्ठ देशात सर्वोत्तम असल्याचे सांगितले जाते. या सागवान काष्ठाचा अयोध्येत निर्माणाधीन श्रीराम मंदिरासाठी पुरवठा केल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह वनमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चम्पत राय यांनी यासंदर्भात मुनगंटीवार यांना सविस्तर पत्र पाठविले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट २०२० रोजी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. तेव्हापासून श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य वेगाने सुरू आहे. एक हजार वर्ष श्रीराम मंदिराची वास्तू डौलात उभी राहावी, यासाठी वास्तूतज्ज्ञांच्या मदतीने मंदिराची इमारत उभारण्यात येत आहे. यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला मंदिराच्या महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, मुख्य मंदिर वास्तूतील इतर दरवाजे यासाठी देशातील सर्वोत्तम सागवान लाकडाची गरज असून त्यासाठी चंद्रपूर येथून हे लाकूड पाठवण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number