‘चंद्रकांत पाटलांची व्यक्तिगत भूमिका’

बाबरी मशिदीवरून राजकारण चांगलच तापलं आहे. बाबरी पाडण्याबाबत सेनाभवनात कोणतीही योजाना आखली नाही तर बाबरी पाडताना बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक नव्हते, असे वक्तव्य भाजपा नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याप्रकरणी उद्धव गट आक्रमक झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अयोध्येत रामजन्म भूमीचे आंदोलन […]

‘चंद्रकांत पाटलांची व्यक्तिगत भूमिका’

बाबरी मशिदीवरून राजकारण चांगलच तापलं आहे. बाबरी पाडण्याबाबत सेनाभवनात कोणतीही योजाना आखली नाही तर बाबरी पाडताना बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक नव्हते, असे वक्तव्य भाजपा नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याप्रकरणी उद्धव गट आक्रमक झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अयोध्येत रामजन्म भूमीचे आंदोलन सुरू होते. तेव्हा सर्व कारसेवक प्रभू रामाचं मंदीर बांधण्यासाठी तेथे पोहचले होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदीसंदर्भात मांडलेली भूमिका व्यक्तीगत आहे, परंतु ती पक्षाची नसल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

रामजन्म भूमीचे आंदोलन हा एक मोठा विचार होता. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या समर्थनात हे आंदोलन करण्यात आले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक त्याठिकाणी नव्हते, असं म्हणणं चुकीचं आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची व्यक्तिगत भूमिका आहे, पक्षाची नाही, असे बावनकुळे म्हणाले.

चंद्रकांत पाटलांचा दावा काय?

अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली आहे. त्यावेळी तेथे शिवसेनेचा एकही कार्यकर्ता उपस्थित नव्हता. उद्धव गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत बाबरी पाडल्याबाबत नेहमीच बोलतात, मात्र, प्रश्न असा आहे की, त्यावेळी ते अयोध्येत होते का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number