CBSE Exam: 2026 पासून CBSEची डबल बोर्ड परीक्षा प्रणाली लागू; नियमांमध्ये झाले हे बदल

CBSE ने 2026 पासून दहावीच्या दोन Board Examination घेण्याची पद्धत स्पष्ट केली आहे. मुख्य परीक्षा अनिवार्य असून Practical आणि Internal Assessment वर्षातून एकदाच घेतले जातील.

CBSE Exam: 2026 पासून CBSEची डबल बोर्ड परीक्षा प्रणाली लागू; नियमांमध्ये झाले हे बदल

नवी दिल्ली: दहावीच्या दोन परीक्षा (Two Board Examination) घेण्याच्या निर्णयामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी उत्सुकता आणि काही प्रमाणात संभ्रमही निर्माण झाला होता. National Education Policy (NEP) नुसार Central Board of Secondary Education (CBSE) 2026 पासून वर्षातून दोन वेळा Board Examination घेणार आहे. या नव्या पद्धतीबद्दलचा संभ्रम दूर करण्यासाठी CBSE ने विशेष वेबिनार आयोजित केले आणि सर्व महत्त्वाचे नियम व प्रक्रिया स्पष्ट केली. CBSE चे चेअरमन यांनी सांगितले की, हा निर्णय अचानक घेतलेला नाही. सेमिस्टर पद्धतीचा विचारही करण्यात आला होता, पण त्यातून अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, असे समोर आल्याने वर्षातून दोन Board Examination हीच सर्वोत्तम पद्धत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करणे आणि मूल्यांकन अधिक पारदर्शक करणे, हे या निर्णयामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.

CBSE ने स्पष्ट केले की पहिली Board Examination हीच ‘मुख्य’ परीक्षा असेल आणि प्रत्येक विद्यार्थ्याने त्यात बसणे बंधनकारक आहे. एखाद्या विद्यार्थ्याने पहिल्या परीक्षेत किमान तीन विषयांची परीक्षा दिलेली नसल्यास त्याला दुसऱ्या Board Examination साठी बसण्याची परवानगी मिळणार नाही. दुसरी परीक्षा फक्त त्या विषयांसाठी असेल ज्यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक External Assessment असते. महत्त्वाचे म्हणजे Practical Examination आणि Internal Assessment हे वर्षातून एकदाच घेतले जाईल. या परीक्षा पहिल्या Board Examination बरोबर घेतल्या जाणार आहेत आणि दुसऱ्या वेळेस यांची पुनरावृत्ती केली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पहिल्या परीक्षेत या घटकांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

हेही वाचा: SC On Bill Assent : राष्ट्रपती आणि राज्यपालांसाठी न्यायालय अंतिम मुदत ठरवू शकत नाही : सर्वोच्च न्यायालय

पहिल्या Board Examination चा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या परीक्षेसाठीची विंडो खुली केली जाईल. CBSE च्या माहितीनुसार निकालानंतर साधारण 10 ते 15 दिवसांत ही नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. पहिल्या परीक्षेचे निकाल एप्रिल महिन्यात, तर दुसऱ्या परीक्षेचे निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात घोषित होतील. त्यानंतर देशभरातील प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकते.

विद्यार्थी आणि पालकांना अधिक मदत मिळावी म्हणून CBSE ने हेल्पलाइनही उपलब्ध करून दिली आहे. कोणत्याही शंकेसाठी विद्यार्थी WhatsApp नंबर 7906627715 वर संपर्क करू शकतात किंवा info.exam@cbseshiksha.in या ईमेलवर प्रश्न पाठवू शकतात. दोन Board Examination ची पद्धत ही विद्यार्थ्यांसाठी नवी असली तरी ती ताण कमी करत संधी वाढवणारी ठरेल, असा CBSE चा दावा आहे.

हेही वाचा: Nitish Kumar: मोदी – शाहंच्या उपस्थितीत नितीश कुमार यांनी घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number