California Mayor Eileen Wang : महापौर अमेरिकेतील शहराची, मात्र चीन समर्थनार्थ प्रचार; FBI च्या आरोपानंतर आयलीन वांग यांचा राजीनामा

स्थानिक समुदायामध्ये चीन-समर्थक प्रचार केल्याच्या गंभीर गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आयलीन वांग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.<br/>

California Mayor Eileen Wang : महापौर अमेरिकेतील शहराची, मात्र चीन समर्थनार्थ प्रचार; FBI च्या आरोपानंतर आयलीन वांग यांचा राजीनामा

कॅलिफोर्निया : कॅलिफोर्निया शहरातील महापौर म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेवर चीन सरकारची बेकायदेशीर एजंट म्हणून काम केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे, असे न्याय विभागाने सोमवारी सांगितले. लॉस एंजेलिसच्या उत्तरेला असलेल्या आणि सुमारे 50 हजार लोकसंख्या असलेल्या आर्केडिया शहराच्या महापौर आयलीन वांग (वय 58) यांनी या गंभीर गुन्ह्याची कबुली देण्याचे मान्य केले आहे, असे विभागाने एका निवेदनात म्हटले आहे. आर्केडिया सिटी कौन्सिलच्या वेबसाइटनुसार, वांग यांनी सोमवारी आपल्या महापौरपदाचा राजीनामा दिला आहे.

हेही वाचा : Western Railway: लोकल प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! मुंबईत दोन ट्रेन समोरासमोर आल्याने खळबळ

काय आहे प्रकरण

फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ने सोमवारी सांगितले की, आर्केडियाच्या महापौर आयलीन वांग यांच्यावर चीनच्या बेकायदेशीर एजंट म्हणून काम केल्याचा आरोप फेडरल कोर्टात ठेवण्यात आला आहे. एफबीआयने म्हटले आहे की, 2020 च्या अखेरीपासून ते 2022 पर्यंत, वांग आणि याओनिंग “माइक” सन यांनी चिनी सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आणि नियंत्रणाखाली काम केले. तसेच यूएस न्यूज सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेत चीन-समर्थक प्रचार करण्यासारख्या अनेक गोष्टींद्वारे चीनच्या हितांना चालना देण्यासाठी अमेरिकेतील व्यक्तींसोबत समन्वय साधला. एफबीआयच्या मते, ही “स्थानिक चिनी-अमेरिकन समुदायासाठी बातम्यांचा स्रोत असल्याचा दावा करणारी एक वेबसाइट होती. त्यांना पीआरसी (चीन प्रजासत्ताक) सरकारी अधिकाऱ्यांकडून वेबसाइटवर चीन-समर्थक मजकूर पोस्ट करण्याचे निर्देश मिळाले आणि त्यांनी त्याची अंमलबजावणी केली.” 

अमेरिकेत परदेशी सरकारचे बेकायदेशीर एजंट म्हणून काम करण्याच्या गुन्ह्यासाठी कमाल 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. या प्रकरणी न्याय विभागाने म्हटले आहे की, वांग आणि त्याचा साथीदार, याओनिंग सन, यांनी स्थानिक चिनी-अमेरिकन समुदायासाठी असलेल्या ‘यूएस न्यूज सेंटर’ नावाच्या वेबसाइटद्वारे चीन-समर्थक प्रचार केला. सनने 2025 मध्ये परदेशी सरकारचे बेकायदेशीर एजंट म्हणून काम केल्याचा गुन्हा कबूल केला आणि तो चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या आठवड्यात बीजिंगला भेट देणार असून ते त्यांचे चिनी समकक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number