अर्थसंकल्प २०२२ : देशासाठी ‘या’ महत्त्वाच्या घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प २०२२ सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये केंद्र अर्थमंत्र्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. जाणून घ्या, काय आहेत नव्या घोषणा? कररचना नोकरदारांच्या कररचनेत बदल नाही. दिव्यांगांसाठी करसवलतीची घोषणा. पेन्शन करात सवलत. सहकरी संस्थांसाठी १८.५ टक्क्यांवरून १५ टक्के करसवलत. कॉर्पोरेट कर अधिभार ३ टक्के घटला. छाप्यात मिळालेली संपत्ती सरकारजमा होणार. […]
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प २०२२ सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये केंद्र अर्थमंत्र्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. जाणून घ्या, काय आहेत नव्या घोषणा?
कररचना
नोकरदारांच्या कररचनेत बदल नाही.
दिव्यांगांसाठी करसवलतीची घोषणा.
पेन्शन करात सवलत.
सहकरी संस्थांसाठी १८.५ टक्क्यांवरून १५ टक्के करसवलत.
कॉर्पोरेट कर अधिभार ३ टक्के घटला.
छाप्यात मिळालेली संपत्ती सरकारजमा होणार.
कृषीक्षेत्र
नऊ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली.
कृषी क्षेत्रासाठी २.३७ लाख कोटीची तरतूद.
नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणार.
कृषी क्षेत्रातील स्टार्टअपना मदत करणार.
तेलबिया आयात कमी करणार.
तेलाच्या किमती नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न.
पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर.
‘एक उत्पादन, एक रेल्वे स्थानक’ योजना.
डिजिटल चलन आणि क्रिप्टो करन्सी
आरबीआयचे स्वत:चे डिजिटल चलन असेल.
क्रिप्टो करन्सी घोटाळ्यावर मोदी सरकारचा तोडग्याचा प्रयत्न
क्रिप्टो करन्सीच्या उत्पन्नावर ३० टक्के कर.
गुंतवणूक
मोदी सरकारने भांडवली गुंतवणूक वाढवली.
आगामी आर्थिक वर्षात भाडंवली गुंतवणूक साडेसात लाख कोटी.
आगामी वर्षात वित्तीय तूट ६.९ टक्के असेल.
संरक्षण क्षेत्र
संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवणार.
खासगी क्षेत्राला संरक्षण क्षेत्रात प्रोत्साहन देणार.
भारत ६८ टक्के स्वदेशी संरक्षण साहित्य खरेदी करेल.
ई-टेंडर
केंद्र सरकार ऑनलाईन कामावर भर देणार’
केंद्र सरकारचे अधिकाधिक कामकाज ई टेंडर पद्धतीने’
शिक्षण वाहिन्या
शालेय शिक्षणासाठी टीव्ही चॅनलचे जाळे उभारणार.
देशभरात स्थानिक भाषेतील १०० शिक्षण वाहिन्या सुरू होणार.
बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी १०० शिक्षण वाहिन्या सुरू होणार.
लघु आणि मध्यम उद्योग
लघु आणि मध्यम उद्योगासाठी २ लाख कोटींचे अर्थसहाय्य.
उद्योग आणि दळणवळण वाढीसाठी ‘एक खिडकी योजना’
दमणगंगा-पिंजार प्रकल्पाला गती मिळणार.
पंतप्रधान गतिशक्ती योजनेतून पायाभूत सुविधा विस्तार.
आयुर्विमा महामंडळाचा आयपीओ लवकरच येणार.
येत्या ३ वर्षात नव्यादमाच्या ४०० वंदे भारत गाड्या धावणार.