चांद्रयान-2 अवकाशात महत्वाचे टप्पे पार करुन चंद्राजवळ पोहोचलं. परंतु शेवटच्या अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विक्रम लँडरचा संपर्क तुटला. चांद्रयान-2 मोहिमेला अपयश आल्यामुळे शास्त्रज्ञ निराश झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र शास्त्रज्ञांना हिंमत न हारण्याचा संदेश दिला. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान वाटतो, असं म्हणत शास्त्रज्ञांना भविष्यातील मोहिमेसाठी प्रोत्साहनही दिलंय.
पंतप्रधानांप्रमाणेच Bollywood च्या कलाकारांनीही ISRO च्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलंय.
बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी ISRo च्या वैज्ञानिकांना धीर देणारं चित्र ट्विट करत मोहिमेला आलेलं अपयश ही नव्या यशाची नांदी असल्याचं म्हटलं.
तू ना थके गा कभी , तू ना मुडे गा कभी,
कर शपथ कर थपथ कर शपथ , अग्नीपथ अग्नीपथ अग्नीपथ. असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
T 3281 –
Pride never did face defeat .. our pride , our victory ..
Proud of you ISRO
तू ना थके गा कभी ,
तू ना मुड़े गा कभी , तू ना थमे गा कभी
कर शपथ कर शपथ कर शपथ
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ pic.twitter.com/oEs0C70LAP — Amitabh Bachchan (@SrBachchan) September 7, 2019
T 3281 – ” Moon is 3,84,400 kms and we failed at 2.1 KM
that’s 0.0005463% of margin.Even this failure is a foundation for new beginnings.
Even this failure has a taste of success in it.
Kudos to our Scientists and ISRO ?? “ ~ KK Gajraj .. from FB pic.twitter.com/rnRD7Yuh4f — Amitabh Bachchan (@SrBachchan) September 7, 2019
” गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में, वो तिफ्ल क्या गिरे जो घुटनों के बल चले” , हा प्रसिद्ध शेर Tweet अभिनेते अनुपम खेर यांनी ISRO च्या वैज्ञानिकांचं कौतुक केलंय.
गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में, वो तिफ्ल क्या गिरे जो घुटनों के बल चले!!!
Well done @isro. We are proud of you.??? — Anupam Kher (@AnupamPKher) September 6, 2019
आपण यशस्वी होई, अशी आशा व्यक्त करत खऱ्या अर्थाने भविष्य त्यांचंच असतं, जे स्वप्नांवर विश्वास ठेवतात, असं अभिनेता रितेश देशमुख याने म्हटलं. इस्रोच्या टीमचा मला अभिमान आहे असं त्याने Tweet केलंय.
We shall over come!!!!! Future belongs to those who believe in the beauty their dreams!! We are incredibly proud of the entire team of @isro – what was achieved today was no small feat. #JaiHind https://t.co/ktuJjb9ozx — Riteish Deshmukh (@Riteishd) September 6, 2019
अभिनेता आर. माधवन याने ISRO टीमला धीर देताना आपल्या ब्लॉकबस्टर ‘3 इडियट्स’ सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग Tweet केलाय. ‘ऑल इज वेल’ म्हणत माधवन याने वैज्ञानिकांना प्रोत्साहित केलंय.
Hoping that is true bro.. “ALL IS WELL…ALL IS WELL” with hand on my heart. ❤️.. but the divination from the planned path was minimal.. ??? https://t.co/iXfm7ZGhds — Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) September 6, 2019
‘ख्वाब अधुरा रहा पर हौसले जिंदा है, ISRO वो हे जहां मुश्कीले भी शर्मिंदा है’, असं म्हणत Tweeter वर कायम भन्नाट tweets साठी ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने आपल्या भावना ट्वीटरवर व्यक्त केल्या.
Khwaab Adhoora raha par Hauslein Zinda hain ,
Isro woh hai, jahaan mushkilein Sharminda hain .
Hum Honge Kaaamyab #Chandrayan2 — Virender Sehwag (@virendersehwag) September 7, 2019