राज्यातील सहा विधानपरिषद जागांसाठी निवडणुकीपैकी चार ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली आहे. तसेच नागपूर आणि अकोला या ठिकाणी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय मिळवला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूरमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले, ‘भाजपने घोडेबाजार करून हा विजय मिळवला आहे. घोडेबाजार होणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. त्यांच्या आपल्या मतदारांवर विश्वास नव्हता. जो निकाल आला त्याचे स्वागातच करायला पाहिजे. तसेच उमदेवार बदलल्याने आम्हांला काहीही फरक पडला नसला’, नाना पटोले म्हणाले आहे.
विधान परिषद निवडणुकी तोंडावर असताना प्रदेशाध्यक्ष नाटा पटोले यांच्यावर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली. काँग्रेसने डॉ. रविंद्र भोयर यांना बदलून त्यांच्याऐवजी मंगेश देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र आता भाजपमधून काँग्रेसध्ये आलेले नगरसेवक डॉ. रविंद्र भोयर यांना केवळ एकच मत मिळाले. तर काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मत मिळाली.