पश्चिम आशियातील संघर्ष चौथ्या आठवड्यात असून इराणमधील युद्ध आणि होर्मुज सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीमुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतीयांवर मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
भारतात LPG गॅल सिलिंडरनंतर कच्च्या तेलाच्या किमतींत देखील मोठी वाढ झाली. ज्याचा परिणाम थेट भारतातील खाण्यापिण्यावर झाला आहे. अशातच आता किराणा दुकानातून मिळणारे बिस्किट पुडे, चिप्सचे पाकीट किंवा साबण यांसारख्या रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी देखील सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ झाल्यामुळे कच्च्या मालाचा वाढता खर्च भरून काढण्यासाठी पारले, डाबर आणि लहोरी जीरा यांसारख्या मोठ्या एफएमसीजी कंपन्यांनी उत्पादनांच्या किमती वाढवण्याची संख्या आहे. कच्च्या तेलाच्या फटक्यामुळे 'क्रूड ऑईल डेरिव्हेटिव्हज'चे दर गगनाला भिडले आहेत. तसेच प्लास्टिक पॅकेजिंग आणि वाहतुकीचा खर्च देखील 15 ते 20 टक्क्यांनी वाढला आहे. कंपन्यांना जीएसटी कपातीची अपेक्षा होती, परंतु युद्धाने या सर्व अपेक्षांवर पाणी फेरले आहे. यामुळे कंपन्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.