Bigg Boss 19 Winner : फरहाना–प्रणीत नाही तर ‘या’ स्पर्धकाने पटकावलं ‘बिग बॉस 19’चं विजेतेपद

7 डिसेंबर रोजी सलमान खान बिग बॉस शोच्या 19 व्या सीझनच्या विजेत्याचे नाव जाहीर केले. 'बिग बॉस 19'च्या विजेतेपदावर प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्ना याने आपलं नाव कोरलं आहे.

Bigg Boss 19 Winner : फरहाना–प्रणीत नाही तर ‘या’ स्पर्धकाने पटकावलं ‘बिग बॉस 19’चं विजेतेपद

सलमान खानचा बहुप्रतिक्षित रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 19'  16 स्पर्धकांसह 24 ऑगस्टपासून जिओ हॉटस्टार आणि कलर्स टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला. 24 ऑगस्टला 16 स्पर्धकांसह सुरू झालेल्या शोमध्ये नंतर शहबाज बदेश आणि मालती चाह या दोन वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळे एकूण 18 स्पर्धक झाले. बिग बॉस 19 च्या अंतिम सोहळ्याचा दिवस जवळ आला आहे.

यादरम्यान 7 डिसेंबर रोजी सलमान खान बिग बॉस शोच्या 19 व्या सीझनच्या विजेत्याचे नाव जाहीर केले. 'बिग बॉस 19'च्या विजेतेपदावर प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्ना याने आपलं नाव कोरलं आहे. तर फरहाना भट्ट हा उपविजेता ठरला. मराठमोळा प्रणीत मोरे हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला मत देऊन त्याला 'बिग बॉस 19' चा विजेता बनवण्याची संधी होती.

हेही वाचा- Bigg Boss 19: ‘बिग बॉस 19’ फिनालेपूर्वी बदलला टाइम स्लॉट! आता कुठे आणि कधी पाहता येणार? इथे आहे संपूर्ण माहिती

मात्र, मतदानाची प्रक्रिया रविवार, 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता बंद झाली. त्यानुसार ग्रँड फिनालेमध्ये गौरव खन्ना, फरहाना भट्ट, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल हे पाच जण पोहोचले होते. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर अमाल मलिक आणि तान्या मित्तल चौथ्या स्थानावर घराबाहेर पडले. त्यानंतर गौरव खन्ना, फरहाना भट्ट आणि प्रणीत मोरे यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. 

विजेतेपद पटकावल्यानंतर गौरव खन्नाला 50 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले एवढचं नव्हे तर प्रत्येक आठवड्यासाठी त्याला 17.5 लाख रुपये मानधन मिळालं असल्याचं समोर आलं आहे. बिग बॉस 19 या शोमध्ये भांडणे आणि मैत्रीचे अनेक रुप पाहायला मिळाले. यावर बिग बॉसने म्हटलंकी, ड्रामा, भांडणं आणि आरडाओरड हे सर्व शोची ओळख असून ही गौरवच्या शांत खेळीची खिल्ली उडवण्यात आली होती. फिनालेमध्ये आपली जागा निश्चित करणारा तो पहिला स्पर्धक ठरला होता. तिकिट टू फिनाले जिंकल्यानंतर आता गौरवने विजेतेपदही पटकावलं आहे.

हेही वाचा- Vikram Bhatt Arrested : IVF फसवणूक प्रकरणात चित्रपट निर्माते विक्रम भट्ट अटकेत; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

दरम्यान दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना सलमान खान भावूक होत म्हणाला की, धर्मेंद्रजी माझ्या वडिलांसारखे होते, पण यावेळी ते शोमध्ये येऊ शकले नाही. धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना सलमानच्या डोळ्यातून अश्रू आल्याचं पाहायला मिळालं. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number