महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार उपलब्ध करून देणे, या उद्देशाने भाजपने मानधनावर भरती करण्याची भूमिका घेतली आहे. महापौर सतिश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेतील ‘क’ व ‘ड’ संवर्गातील रिक्त पदे मानधनावर भरती केली जाणार असून सातशे सफाई कर्मचाऱ्यांची देखील मानधनावर नियुक्तीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहीत महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.
नाशिक महापालिकेत गेल्या २४ वर्षांपासून नोकरभरती झालेली नाही. महापालिकेत विविध संवर्गामध्ये एकूण ७०९० पदे मजूंर झाली असून त्यापैकी २६३१ पदे अधिकारी, कर्मचाऱ्यांची दरमहा होणारी सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त झाली आहेत. त्यामुळे चतुर्थश्रेणी वर्गातील बिगारी, फायरमॅन, व्हाल्वमॅन, वाहनचालक, सफाई कामगार, कनिष्ठ लिपीक, उद्यान निरिक्षक, माळी, उद्यान बिगारी, इंजिनिअर्स या पदांसाठी मानधनावर भरती होणार आहे.
भाजपचे माजी गटनेते जगदीश पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून नगारिकांना सेवा देण्यासाठी मनुष्यबळाची गरज असल्याचे सांगितले होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार उपलब्ध करून देणे, या उद्देशाने भाजपने मानधनावर भरती करण्याची भूमिका घेतली आहे.