प्रवाशांसाठी मोठी बातमी! रेल्वे प्रवासाच्या नियमांत बदल

भारतीय रेल्वे प्रवासाच्या नियमांत बदल केले असून कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या जनरल बोगींमध्ये सामान्य तिकिटांवर प्रवास करण्याची मंजूरी रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वे प्रशासनाने जनरल बोगींवर घातलेले निर्बंध काढले असल्यामुळे प्रवाशांना आता मेल एक्सप्रेसच्या जनरल बोगींमध्ये आरक्षित तिकिटांवर प्रवास करता येणार आहे. सध्या जनरल बोगीमध्ये आरक्षित तिकिटांवर प्रवास केला जातो. ज्या दिवशी बोगीत आरक्षण […]

प्रवाशांसाठी मोठी बातमी! रेल्वे प्रवासाच्या नियमांत बदल

भारतीय रेल्वे प्रवासाच्या नियमांत बदल केले असून कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या जनरल बोगींमध्ये सामान्य तिकिटांवर प्रवास करण्याची मंजूरी रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

रेल्वे प्रशासनाने जनरल बोगींवर घातलेले निर्बंध काढले असल्यामुळे प्रवाशांना आता मेल एक्सप्रेसच्या जनरल बोगींमध्ये आरक्षित तिकिटांवर प्रवास करता येणार आहे. सध्या जनरल बोगीमध्ये आरक्षित तिकिटांवर प्रवास केला जातो. ज्या दिवशी बोगीत आरक्षण नसेल त्यावेळी अनारक्षित तिकिटांवर प्रवास करता येणार आहे त्यामुळे जनरल बोगीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना वाट बघावी लागणार आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून प्रवासी जनरल बोगीवर असे निर्बंध हटवून त्यातून जनरल तिकिटांवर प्रवास करण्याची मंजुरी द्यावी, अशी मागणी सातत्याने करीत होते ती मागणी अखेर मान्य झाली आहे. रेल्वे प्रशासनाने लोकल प्रवाशांना डेमो जनरल तिकीट उपलब्ध करून दिले आहेत.

होळी उत्सवासाठी विशेष गाड्या

तसेच होळीनिमित्त रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे ७ मार्च ते २० मार्च या कालावधीमद्ये देशात २५० विशेष गाड्या धावणार  आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number