भूषण देसाईंचा शिवसेनेत प्रवेश

माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाईंनी पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हातातून निसटले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे […]

भूषण देसाईंचा शिवसेनेत प्रवेश

माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाईंनी पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव गटाला मोठा धक्का बसला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हातातून निसटले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याचा अधिकार मिळाला. राज्यातील सत्तासंघर्षात अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे नव्या जोमाने पुन्हा पक्ष विस्तारणीच्या तयारीला लागले आहेत. अशातच आता, उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय माजी मंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत भूषण देसाई यांनी पक्षप्रवेश केला.

यापूर्वी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव गटाला रामराम ठोकला. तसेच अनेक आमदार, नगरसेवक यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सुषाभ देसाईंचा मुलगा भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे उद्धव गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number