आसाम पर्यटन विभागाच्या जाहिरातीने नवा वाद निर्माण केला आहे. भीमाशंकर या महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगावर आसाम सरकारने दावा केल्यामुळे खळबळ माजली आहे.
आसाम सरकारने पर्यटन विभागाच्या जाहिरातीत भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा केला आहे. आसामच्या पर्यटन विभागाने काढल्या जाहिरातीत महाराष्ट्रातील भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंग आसाममध्ये आहे, असे म्हटले आहे.
शिवपुराणात उल्लेख असलेली डाकिनी पर्वतराजी आसामात आहे.
शिवपुराणात सांगितलेले भीमाशंकर डाकिनी पर्वतराजीत वसल्याचे म्हटले आहे.
डाकिनी पर्वतराजी आसामात असल्याने शिवपुराणात सांगितलेले भीमाशंकरही आसाम राज्यात आहे.
आसामच्या या दाव्यावर महाराष्ट्र काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. तसेच, शिंदे- फडणवीस सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही केली आहे.