मुंबई, 2 मे २०२३, प्रतिनिधी : मराठी सिनेमांना सिनेमागृहात बऱ्याचदा जास्त स्क्रीन मिळत नाही ही समस्या अनेकदा पाहायला मिळते या विषयी अनेक कलाकार समाज माध्यमांवर आवाज उठवताना देखील दिसून येतात. सध्या काही मराठी सिनेमे प्रदर्शित झाले आहेत तर काही सिनेमे प्रदर्शित च्या वाटेवर आहे.अशातच मराठी सिनेमाला स्क्रीन न मिळाल्या मुळे मराठी चित्रपटतील दिग्दर्शकाला हात जोडून माफी मागावी लागली. भाऊसाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित TDM हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. राज्यात ज्या ज्या सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित झाला, तिथे त्याला चांगलं ओपनिंग मिळाल्याचं म्हटलं जात आहे.
पण, बऱ्याच ठिकाणी टीडीएम सिनेमाचे शो रद्द केले जात आहेत, ख्वाडा’, ‘बबन’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर ‘टीडीएम’ हा सिनेमा सिनेरसिकांच्या भेटीस घेऊन येणारे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांना आता अश्रू अनावर झालेत.याविषयी बोलताना भाऊराव थोडं स्पष्टच म्हणाले की, ‘ ‘टीडीएम’ चित्रपट लोकांना आवडतोय आणि लोक हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त ही करतायत मात्र सिनेमागृहात शो नसल्याकारणास्तव मराठी प्रेक्षकांवर आणि आम्हा सर्व कलाकारांवर हा अन्याय होतोय. मला कुठेतरी वाटतंय की हे सर्व चित्र पाहून मराठी सिनेमा संपतोय, किंवा संपवला जातोय. आता यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही.
आम्ही असं म्हणत नाही आमचा सिनेमा चांगला आहे, पण सिनेमाला प्रेक्षक प्रतिसाद देत असताना शो रद्द करणं हे कितपत योग्य आहे. परवा पासून पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात एक शो होता, काल दोन शो होते. सिनेमागृह तुडुंब भरलेले असताना ही वाढवून शो दिलाच नाही.’पुढे ते म्हणाले की, ‘लोकांना चित्रपट पाहायचाय त्यांची मागणी आहे, म्हणून मी स्वतः सिनेमागृहाच्या मालकांजवळ विचारपूस केली तर त्याच असं म्हणणं आहे की एकच शो लावा असा वरून प्रेशर आहे. माझ्या चित्रपटाला जे शो मिळाले आहेत ते पण प्राईम टाईम मधील नसून ऑड टाईममधील आहेत, आणि ऑड टाईम असल्यामुळे प्रेक्षकांना त्या वेळेत तिथवर पोहोचणं शक्य नाही. आणि हे सर्व पाहून आम्हाला खूप त्रास होतोय. माझा चित्रपट नसेल आवडला तर स्पष्ट मला लोकांनी सांगावं की, तुझा सिनेमा चांगला नाही, तू लायक नाहीस त्या दिवशी मी सिनेमा निर्मितीच काम बंद करेन’. असं म्हणून भाऊराव कऱ्हाडे यांना अश्रू अनावर झाले.