भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

आम आदमी पार्टीचे भगवंत मान यांनी आज पंजाबच्या २५व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. हा शपथविधी सोहळा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव खटकर कलान येथे पार पडला. यावेळी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचे पक्षनेते उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षांच्या एकाही नेत्याला निमंत्रित करण्यात आलेले नाही. शपतविधीपूर्वी भगवंत मान यांनी […]

भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

आम आदमी पार्टीचे भगवंत मान यांनी आज पंजाबच्या २५व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. हा शपथविधी सोहळा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव खटकर कलान येथे पार पडला. यावेळी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचे पक्षनेते उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षांच्या एकाही नेत्याला निमंत्रित करण्यात आलेले नाही.

शपतविधीपूर्वी भगवंत मान यांनी ट्विट केले होते की, ‘सूर्याच्या सोनेरी किरणाने आज नवी पहाट उगवली आहे. शहीद भगतसिंह आणि बाबा साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी संपूर्ण पंजाब आज खटकर कलान येथे शपथ घेणार आहे. शहीद भगत सिंहच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी मी त्यांच्या मूळ गावी खटकर कलानकडे रवाना होत आहे.’

पंजाब विधानसभा निवडणुकींमध्ये काँग्रेसचा पराभव झाला असून आम आदमी पार्टीने विजयाचा झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ १८ जागा जिंकता आल्या आहेत. तसेच आपने ११७ जागांपैकी ९२ जागा जिंकल्या  आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number