उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना दिल्ली उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मानहाणीच्या दाव्याबाबत दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर १७ एप्रिलला सुनावणी होणार आहे. या याचिकेवर सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. या सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी आदित्य ठाकरेंसह आणि संजय राऊतांना समन्स बजावला आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये उद्धव ठाकरेंना कोर्टात हजर राहावं लागणार आहे.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानी प्रकरणी एक याचिका दाखल केली होती. ज्या आमदार खासदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता. त्या आमदार, खासदारांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्षेपार्ह्य विधाने केली असल्याचा उल्लेख याचिकेत करण्यात आलेला आहे.
या मानहानी प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आज याचिका दाखल करुन घेतली. त्यानंतर संजय राऊत यांच्यासह ठाकरे पिता पुत्रांना समन्स बजावले आहे. तसेच, न्यायालयाने तिघांनाही याप्रकरणी प्रत्यक्षपणे न्यायालयामध्ये हजर राहून आपली बाजू मांडावी, अशा सूचनाही न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत.