तब्बल १३ वर्षांनी मोडला संसार

मुंबई, २७ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांप्रमाणेच छोट्या पडद्यावरील काही जोड्या देखील नेहमी चर्चेत असतात. अशाच प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री बरखा बिश्त आणि अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता यांची जोडी. परंतू आता हे दोघे लग्नाच्या तब्बल १३ वर्षानंतर वेगळे झाले आहेत. नुकतेच अभिनेत्री बरखाने दोन वर्षांनंतर इंद्रनीलसोबत घटस्फोटावर मौन सोडले आहे. अलीकडेच एका मुलाखतीत, बरखा […]

तब्बल १३ वर्षांनी मोडला संसार

मुंबई, २७ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांप्रमाणेच छोट्या पडद्यावरील काही जोड्या देखील नेहमी चर्चेत असतात. अशाच प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री बरखा बिश्त आणि अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता यांची जोडी. परंतू आता हे दोघे लग्नाच्या तब्बल १३ वर्षानंतर वेगळे झाले आहेत. नुकतेच अभिनेत्री बरखाने दोन वर्षांनंतर इंद्रनीलसोबत घटस्फोटावर मौन सोडले आहे.

अलीकडेच एका मुलाखतीत, बरखा बिश्तने आपल्या खाजगी आयुष्याच्याबाबतीत काही खुलासे केले. यावेळी ती म्हणाली, “आम्ही दोघं लवकरच घटस्फोट घेणार आहेत. हा निर्णय माझ्या आयुष्यातील एक कठीण निर्णय आहे. यापुढे मी मीराला सिंगल मदर म्हणून वाढवणार आहे.” पुढे ती म्हणाली “आता मीरा हीच माझी प्रायोरिटी आहे.” एक काळ असा होता जेव्हा इंद्रनील आणि बरखा हे दोघे टीव्हीचे आवडते जोडपे होते. पण लागणीच्या तब्बल १३ वर्षांनी ते दोघे विभक्त झाल्याने त्यासारख्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number