Barack Obama: बराक ओबामांसुद्धा माऊलींच्या पसायदानाची भुरळ

ओबामांचे भारताशी असलेले आत्मिक नाते बराक ओबामा यांचे भारताशी असलेले ऋणानुबंध सर्वश्रुत आहेत. यापूर्वीही त्यांनी भारतीय महापुरुषांच्या विचारांचा गौरव केला आहे.

Barack Obama: बराक ओबामांसुद्धा माऊलींच्या पसायदानाची भुरळ

वॉशिंग्टन: भारतीय संस्कृतीची आध्यात्मिक उंची आणि माऊलींचे विचार हे जगासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिले आहेत. मात्र, जेव्हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासारखा जागतिक दर्जाचा नेता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 'पसायदाना'च्या प्रेमात पडतो, तेव्हा भारतीय संस्कृतीचा डंका पुन्हा एकदा जागतिक स्तरावर घुमतो. ओबामा यांनी 2025 वर्षातील त्यांच्या आवडत्या कलाकृतींची यादी जाहीर केली असून, त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा गौरव केला आहे.

माऊलींच्या शब्दांची जागतिक मोहिनी संत ज्ञानेश्वर महाराजांनी 13 व्या शतकात लिहलेले 'पसायदान' हे केवळ एका धर्माचे किंवा प्रांताचे राहिलेले नाही, तर ते मानवतेचे वैश्विक संकुल झाले आहे. गायिका गाणव्य (Ganavya) यांनी त्यांच्या 'निलाम' (Nilam) या अल्बममध्ये हे पसायदान अत्यंत सात्विक आणि भावपूर्ण स्वरांत गुंफले आहे. हेच स्वर ओबामांच्या हृदयाला भिडले असून, त्यांना या प्रार्थनेची जणू भुरळ पडली आहे. 'जे खळांची व्यंकटी सांडो' ही वैश्विक शांतीची मागणी ओबामांना भावली आहे.

हेही वाचा: Union Budget 2026: संडे की मंडे? 2026 च्या अर्थसंकल्पाच्या तारखेचा सस्पेन्स वाढला

ओबामांचे भारताशी असलेले आत्मिक नाते बराक ओबामा यांचे भारताशी असलेले ऋणानुबंध सर्वश्रुत आहेत. यापूर्वीही त्यांनी भारतीय महापुरुषांच्या विचारांचा गौरव केला आहे. ओबामा केवळ भारताचे चाहते नाहीत, तर ते भारतीय अध्यात्माचे सखोल रसिकही आहेत. पसायदानासारखी नितांत सुंदर रचना ऐकताना त्यात रममाण होणारा हा जागतिक नेता, भारताचा सांस्कृतिक वारसा हा वैश्विक शांततेचा सर्वात मोठा आधार आहे, हेच अधोरेखित करत आहे

ओबामांच्या आवडीमध्ये लेडी गागा, केंड्रिक लामार, आणि व्हिक्टोरिया नोएल यांसारख्या आंतरराष्ट्रीय पॉप आणि हिप-हॉप ताऱ्यांचा समावेश आहे. पाश्चिमात्य संगीताच्या तालावर डोलणाऱ्या जगात, माऊलींच्या शांत आणि अर्थपूर्ण शब्दांनी ओबामांना भुरळ घालणे, ही भारतीय संस्कृतीची खरी ताकद आहे.

साहित्य आणि चित्रपटातही वैविध्य गाण्यांव्यतिरिक्त ओबामांनी त्यांची आवडती पुस्तके आणि चित्रपटांची यादीही प्रसिद्ध केली आहे. यामध्ये 'हॅमनेट', 'द सिक्रेट एजंट' आणि 'ट्रेन ड्रीम्स' यांसारख्या कलाकृतींचा समावेश आहे. मात्र, या सर्वांमध्ये माउलींच्या 'पसायदान' सर्वात तेजस्वी ठरत असून, एका महान भारतीय रचनेला जागतिक स्तरावर मिळालेली ही दाद प्रत्येक भारतीयासाठी आणि विशेषतः मराठी मनासाठी अभिमानास्पद आहे.

हेही वाचा: Madh-Versova Bridge:वाहतूक कोंडी सुटणार! मढ-वर्सोवाकरांचा प्रवास आता सुखकर होणार, 'या' पुलाचे काम अखेर मार्गी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number