Bangladesh Hindu Youth Death: बांगलादेशात हिंदू युवकाला जमावाने मारल्या प्रकरणी दहा आरोपी अटकेत

18 डिसेंबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजता काही समाजकंटकांनी दिपू दास याला अमानुषपणे मारहाण केली, झाडाला लटकवले आणि नंतर मृतदेह जाळला.

Bangladesh Hindu Youth Death: बांगलादेशात हिंदू युवकाला जमावाने मारल्या प्रकरणी दहा आरोपी अटकेत

ढाका: बांगलादेशातील मयमनसिंह (Mymensingh) जिल्ह्यात 27 वर्षीय हिंदू युवक दिपू चंद्र दास (Dipu Chandra Das) याच्या निर्घृण हत्येप्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात रॅपिड अ‍ॅक्शन बटालियन (Rapid Action Battalion, RAB) ने सात संशयितांना, तर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार Muhammad Yunus याने सोशल मीडियावर (X) पोस्ट करत अटकेत असलेल्यांची अधिकृत माहिती दिली.

मुहम्मद युनूस याने सांगितले की, “भालुका (Bhaluka), मयमनसिंह येथे सनातन हिंदू युवक दिपू चंद्र दास याच्या मारहाणीतून झालेल्या हत्येप्रकरणी 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.” RAB कडून अटक करण्यात आलेल्यांमध्ये 19 ते 46 वयोगटातील सात जणांचा समावेश असून, पोलिसांनी आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांविरोधात गंभीर गुन्ह्यांखाली कारवाई सुरू असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: Maharashtra Nagar Parishad, Panchayat Election Results 2025 : 288 नगरपालिकांच्या निकालांचा दिवस! मतदार राजाचा कौल कुणाच्या पारड्यात?

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, RAB आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकून आरोपींना अटक केली. दिपू चंद्र दास याच्यावर धर्मनिंदेचे आरोप (Blasphemy Allegations) लावत जमावाने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली आणि मृतदेहाला आग लावण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण बांगलादेशमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या हत्येचा बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिलने (Bangladesh Hindu Buddhist Christian Unity Council) तीव्र निषेध केला आहे.

18 डिसेंबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजता काही समाजकंटकांनी दिपू दास याला अमानुषपणे मारहाण केली, झाडाला लटकवले आणि नंतर मृतदेह जाळला. या कृत्यामुळे देशातील सांप्रदायिक सलोखा गंभीरपणे धोक्यात आला असल्याचेही परिषदेनं म्हटले आहे. ही घटना बांगलादेशात सुरू असलेल्या राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर घडली आहे.

काही दिवसांपूर्वी विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी (Sharif Osman Hadi) याच्या मृत्यूनंतर देशात तणाव वाढला आहे. ढाकामधील गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आलेल्या हादी याचा 18 डिसेंबर 2025 रोजी मृत्यू झाला होता. हादी ‘इन्किलाब मंचो’चा (Inqilab Moncho) संयोजक आणि फेब्रुवारी 2026 मधील संसदीय निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार होता. त्याच्या अंत्यसंस्कारांना मोठ्या प्रमाणात लोकांनी उपस्थिती लावली. कुटुंबाच्या इच्छेनुसार त्याचे दफन राष्ट्रीय कवी Kazi Nazrul Islam यांच्या समाधीशेजारी करण्यात आले. या सर्व घटनांमुळे बांगलादेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Nora Fatehi Accident : अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारला मद्यधुंद ड्रायव्हरची धडक; अभिनेत्रीच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number