जामीन मंजूर, मात्र न्यायालयाचे आदेश जारी

  क्रूझ ड्रग्जपार्टीप्रकरणी आर्यन खानसह, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांचा जामीन उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. आर्यनसह तीघांनाही दिलासा मिळाला असून न्यायालयाने तिघांवर काही अटी घातल्या आहेत. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.  न्यायालयाच्या परवानगीशिवाय तिघांनाही देशाबाहेर जाता येणार नसून पासपोर्ट […]

जामीन मंजूर, मात्र न्यायालयाचे आदेश जारी

  क्रूझ ड्रग्जपार्टीप्रकरणी आर्यन खानसह, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांचा जामीन उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. आर्यनसह तीघांनाही दिलासा मिळाला असून न्यायालयाने तिघांवर काही अटी घातल्या आहेत. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 न्यायालयाच्या परवानगीशिवाय तिघांनाही देशाबाहेर जाता येणार नसून पासपोर्ट जमा करण्याचे तसेच दर शुक्रवारी तिघांनीही एनसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तिघांनी मुंबईबाहेर जाण्यासाठी एनसीबी तपास अधिकाऱ्याला त्याची माहिती देऊन प्रवासाचा तपशील एनसीबी कार्यालयात दाखल करावा लागेल.

 न्यायालयाच्या आदेशानुसार, तिघांनाही चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. तसेच न्यायालयाच्या प्रत्येक खटल्यात तीघांनाही हजर रहावे लागणार आहे. प्रकरणाशी संबंधित व्यक्तींशी कोणत्याही प्रकारचे संपर्क न साधण्याचे तसेच आरोपींवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होईल असे कृत्य न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 न्यायालयाने दिलेल्या सर्व अटींपैकी कोणतीही अट मोडल्यास एनसीबीला आर्यन, अरबाज, मुनमुन यांचा जामीन रद्द होण्यासाठी एनडीपीएस न्यायालयात अर्ज करता येईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number