मुंबई, ९ जून २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आणि टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ यांना लाखोंचा गंडा बसला आहे. आयेशा श्रॉफ यांनी मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आयेशा यांची तब्बल ५८ लाखांनी फसवणूक केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अॅलन फर्नांडिस नावाच्या व्यक्तीने आयेशा श्रॉफ यांची ५८ लाखांची फसवणूक केली आहे. अॅलन फर्नांडिसविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 408, 465, 467 आणि 468 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात आता मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
‘एमएमए मॅट्रीक्स’ ही टायगर श्रॉफ आणि त्याची आई आयेशा यांची जीम कंपनी आहे. अॅलनची ‘एमएमए मॅट्रीक्स’ कंपनीत 2018 मध्ये डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. परंतू आरोपी अॅलन फर्नांडिस याने टायगर श्रॉफच्या ‘एमएमए मॅट्रीक्स’ या कंपनीत घोटाळा केला असल्याचे म्हंटले जात आहे. आरोपीने विविध देशांमंध्ये 11 स्पर्धा आयोजित करण्यासाठी कंपनीकडून भरपूर पैसे उकळले होते. त्यानंतर त्याने डिसेंबर 2018 ते जानेवारी 2023 पर्यंत कंपनीच्या बँक खात्यातून 58,53,591 रुपये काढण्यात आले आहेत. यामुळेच फसवणूक केल्या प्रकरणी