रायगडावर जात मुख्यमंत्र्यांची राज्याभिषेकाला उपस्थिती

किल्ले रायगडावर गुरुवारी तिथीनुसार 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे.

रायगडावर जात मुख्यमंत्र्यांची राज्याभिषेकाला उपस्थिती

रायगड : किल्ले रायगडावर गुरुवारी तिथीनुसार 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली आहे. मात्र या सोहळ्यावर पावसाचे सावट आहे.  शिवभक्तांकडून राज्याभिषेक सोहळ्याची तयारी केली आहे. मात्र किल्ले रायगड आणि परिसरात बुधवार दुपार पासून जोरदार पाऊस कोसळत आहे. होळीचा माळ, राज दरबारात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे तयारीच्या कामात अडथळे येत आहेत. पावसाबरोबरच रायगडावर धुक्याची दाट चादर पसरलेली पाहायला मिळते. तरीदेखील शिवभक्त मोठ्या संख्येने रायगडावर दाखल होत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number