युक्रेनमध्ये मारोयुपोलमध्ये चित्रपटगृहावर हल्ला

रशिया-युक्रेन युद्धाचा आज २२वा दिवस आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून रशियाची यक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनच्या मारोयुपोलमधील चित्रपटगृहावर हल्ला केला आहे. रशियाने हा हल्ला हवाईमार्गाने केला. या हल्ल्यात जवळपास १००० नागरिक दाबले गेल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तसेच रशियाच्या हल्ल्यात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असल्याचेही युक्रेनने सांगितले आहे. युक्रेनच्या राजधानीत भयाण […]

युक्रेनमध्ये मारोयुपोलमध्ये चित्रपटगृहावर हल्ला

रशिया-युक्रेन युद्धाचा आज २२वा दिवस आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून रशियाची यक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनच्या मारोयुपोलमधील चित्रपटगृहावर हल्ला केला आहे. रशियाने हा हल्ला हवाईमार्गाने केला. या हल्ल्यात जवळपास १००० नागरिक दाबले गेल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तसेच रशियाच्या हल्ल्यात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असल्याचेही युक्रेनने सांगितले आहे.

युक्रेनच्या राजधानीत भयाण शांतता

युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशिया युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला, गोळीबार करत आहे. रशियाची युक्रेनवर लढाई सुरूच आहे. कीवच्या नागरी वस्तीवर रशियाची लढाई सुरू आहे. गेल्या २२ दिवसांपासून रशिया युक्रेनवर हल्ला करत आहे. दरम्यान, आता युक्रेनच्या राजधानीत भयाण शांतता पाहायला मिळत आहे. तर रशियाच्या बॉम्ब हल्ल्यानंतर खारकीव शहर उद्ध्वस्त झाले आहे. तर खारकीवमधील शाळा पूर्णत: उद्ध्वस्त झाले असून धान्य गोदाम खाक झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number