Atharva Sudame: अखेर त्या वादावर सुदामेने मौन सोडलं; म्हणाला, ‘काही लोक AI चा वापर करून वाट्टेल ते…’

PMPML बसमध्ये रील शूट केल्याच्या आरोपानंतर अथर्व सुदामे वादात सापडला आहे.

Atharva Sudame: अखेर त्या वादावर सुदामेने मौन सोडलं; म्हणाला, ‘काही लोक AI चा वापर करून वाट्टेल ते…’

Atharva Sudame: पुण्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रिलस्टार अथर्व सुदामे सध्या एका वादामुळे चर्चेत आला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बसमध्ये परवानगीशिवाय रील शूट केल्याचा आणि महिला प्रवाशांबाबत आक्षेपार्ह आशय दाखवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी PMPML प्रशासनाने अथर्व सुदामेला अधिकृत नोटीस बजावली असून, सात दिवसांच्या आत लेखी खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.

या नोटिशीत संबंधित व्हिडीओ तात्काळ सोशल मीडियावरून हटवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. PMPML प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या व्हिडीओमुळे सार्वजनिक वाहतूक संस्थेची प्रतिमा मलिन होत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत.

या वादानंतर अनेक माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर अथर्व सुदामेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या. काही ठिकाणी त्याच्या नावाने कथित प्रतिक्रिया, विधानं आणि पोस्ट्स व्हायरल होऊ लागल्या. अखेर या सगळ्या गोंधळावर अथर्व सुदामेने

पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

अथर्वने थेट वादावर भाष्य न करता, सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेल्या चुकीच्या माहितीवर नाराजी व्यक्त केली. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून त्याने स्पष्ट केलं की, अनेक न्यूज चॅनेल्स आणि माध्यमं संपूर्ण रील न पाहत चुकीची माहिती पसरवत आहेत. “मी कुठल्याही माध्यमाला अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तरीही माझा फोटो आणि नाव वापरून खोटी विधानं फिरवली जात आहेत,” असं त्याने म्हटलं.

पुढे तो म्हणाला की, काही लोक AI तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या नावाने खोटे स्टेटमेंट्स तयार करत आहेत. “अशा फेक न्यूजवर कोणीही विश्वास ठेवू नये. मला जर काही सांगायचं असेल, तर ते मी स्वतः माझ्या सोशल मीडिया अकाउंटवरून बोलेन,” असं स्पष्ट करत त्याने अफवांवर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, PMPML प्रशासनाकडून आलेल्या नोटिशीनुसार, अथर्वला सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करावा लागणार आहे. संबंधित व्हिडीओ हटवण्यात अपयश आल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. या नोटिशीत PMPMLच्या मुख्य कार्यालयाने सार्वजनिक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे.

या प्रकरणामुळे सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्ससाठी सार्वजनिक ठिकाणी शूटिंग करताना नियम, परवानगी आणि जबाबदारी किती महत्त्वाची आहे, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अथर्व सुदामे पुढे या प्रकरणात काय भूमिका घेतो आणि PMPML नोटिशीला कसा प्रतिसाद देतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

JM

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number