Asha Bhosle Passed Away : पद्मविभूषणसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार, 12 हजारांहून अधिक गाणी, 70 वर्षांहून अधिक अनुभव; असा आहे आशा भोसलेंचा अल्पपरिचय

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं आहे. काल 11 एप्रिल रोजी आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

Asha Bhosle Passed Away : पद्मविभूषणसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार, 12 हजारांहून अधिक गाणी, 70 वर्षांहून अधिक अनुभव; असा आहे आशा भोसलेंचा अल्पपरिचय

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं आहे. काल 11 एप्रिल रोजी आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज त्यांचे दु:खद निधन झाले त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी ही दुर्दैवी बातमी दिली. दरम्यान उद्या सकाळी 11.00 ते 3.00 दरम्यान अंतिम दर्शनासाठी लोअर परळ येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवलं जाईल. तर उद्या सायंकाळी 4.00 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. दादर शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. आशा भोसले यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा- Asha Bhosale : मोठी बातमी! ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचे निधन
दरम्यान 1933 मध्ये जन्मलेल्या हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ गायिका आशा भोसले या भारतीय संगीत क्षेत्रातील महान आणि सर्वात अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहेत. आशा भोसले यांनी 1948 साली कारकिर्दीची सुरुवात केली, चुनरिया या चित्रपटातील सावन आया हे त्यांचे पहिले गाणे होते. आशा भोसले यांनीही 2200 हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या सुरांची जादू दाखवली आहे. 70 वर्षांहून अधिक अनुभवासह, त्यांनी अनेक भाषा आणि संगीत प्रकारांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. हिंदी, मराठी आणि बंगालीसह अनेक भारतीय भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. शास्त्रीय संगीत, गझल, भजने, कॅबरे आणि पॉप गाणी अशा प्रत्येक प्रकारात त्यांनी आपली छाप सोडली. आशा भोसले यांनी आर. डी. बर्मन यांच्यासारख्या महान संगीतकारांसोबत काम केले आहे.

आशा भोसले यांनी बॉलीवूडमधील दिग्गज संगीत दिग्दर्शक आर. डी. बर्मन यांच्याशी विवाह केला होता. ते स्वतःही संगीत क्षेत्रातील सुपरस्टार होते आणि हिंदी चित्रपटांमधील त्यांचे संगीत आजही तितकेच लोकप्रिय आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजासाठी आणि अनोख्या गायन शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले यांनी प्रतिष्ठित पद्मविभूषणसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.  ‘उमराव जान’ मधील गझल तसेच आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची वेगवान गाणी या प्रत्येक गाण्याला आशा  आशाजींच्या आवाजाने प्रत्येक गाण्याला एक नवी उंची दिली. ‘दिल चीज क्या है’, ‘उडे जब जब जुल्फें तेरी’, ‘चैन से हमको कभी’ अशा त्यांच्या गाण्यांनी पिढ्यानपिढ्या रसिकांना मंत्रमुग्ध केले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number