मुंबई, ८ मे २०२३, प्रतिनिधी : राजस्थानमध्ये हवाई दलाचे विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान घरावर कोसळलं असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पायलट आणि सहवैमानिकाने वेळीच उडी मारली त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. राजस्थानच्या हनुमानगडजवळ ही घटना घडली आहे. या विमानाने सुरतगड येथून उड्डाण केले होते. पण अचानक हे विमान कोसळले. सुदैवाने या विमान अपघातामध्ये कोणतिही जीवितहानी झाली नाही. विमानचा पायलट सुरक्षित आहे. अपघातानंतर विमानाला आग लागली आणि ते जळून खाक झाले.
दोन्ही वैमानिक वेळीच पॅराशूटच्या मदतीने उतरण्याचा यशस्वी झाले, मात्र घरात उपस्थित असलेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास सुरू आहे. राजस्थानचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. वृत्तसंस्था एएनआयने भारतीय वायुसेनेच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, भारतीय हवाई दलाचे मिग-२१ लढाऊ विमान राजस्थानमधील हनुमानगढजवळ कोसळले. सुरतगड येथून विमानाने उडाण केले होते. पायलट सुरक्षित आहे.