मुंबई ,२९ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : अभिनेता अर्जुन रामपाल अविवाहित असताना दुसऱ्यांदा बाप होणार आहे. अर्जुनची प्रियसी गॅब्रिएला डेमेट्रिएड्सजुने आपल्या दुसऱ्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. यामुळे त्यांचे चाहते खुश झालेत.
अभिनेता अर्जुन रामपाल आणि मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्स हे दोघे २०१९ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. गॅब्रिएला हिने समाज माध्यमाच्या सहाय्याने ही बातमी दिली. आता गॅब्रिएलाने एक शूट केले आहे. यात ती तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसतेय. या फोटोला तिने,’ वास्तव किंवा एआय?’ असे कॅप्शन दिले आहे. या फोटोखाली सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.