A.R. Rahman’s Son’s  Accident : ए. आर. रहमानच्या मुलाचा भीषण अपघात! समोरच्या गाडीला धडकला अन्…; अमीनच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाचा भीषण अपघात झाला आहे.

A.R. Rahman’s Son’s  Accident : ए. आर. रहमानच्या मुलाचा भीषण अपघात! समोरच्या गाडीला धडकला अन्…; अमीनच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाचा भीषण अपघात झाला आहे. प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानचा मुलगा अमीन आपल्या पोर्श कारमधून जात असताना रॅपिडोच्या वॅगन-आर कारने अमीनच्या कारला जोरदार धडक दिली. सुदैवाने यात अमीन किरकोळ जखमी झाला. यापूर्वीही 2023 मध्ये गाण्याच्या शूटिंगदरम्यान क्रेनला लावलेला जड झुंबर आणि ट्रस अचानक त्याच्यावर कोसळला होता. सुदैवाने त्यावेळीही तो थोडक्यात बचावला.

हेही वाचा- Amruta Khanvilkar: 'सहन करणार नाही…', अभिनेत्री अमृता खानविलकरने दिला कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा, नेमकं प्रकरण काय?

समोर आलेल्या माहितनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास चेन्नईच्या गिंडी परिसरात प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानचा मुलगा आणि गायक आणि संगीत निर्माता ए.आर. अमीन हा त्याच्या मित्रासोबत पोर्श कारमधून जात होता. यादरम्यान रॅपिडोची वॅगन-आर कार साइड रोडवरून मुख्य रस्त्यावर येत असताना तिची अमीनच्या कारला धडक झाली.

यात दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून तातडीने दोघांना कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दुसरीकडे वॅगन-आरमधील व्यक्तीलाही दुखापत झाली असून त्याला कलैग्नर सेंटेनरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अमीन हा संगीत क्षेत्रात प्लेबॅक सिंगर आणि म्युझिक प्रोड्यूसर असून, 'दिल बेचारा' आणि '2.0' यांसारख्या चित्रपटांसाठी त्याने गाणी गायली आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number